शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र आचार-विचाराने जीवनाचे कल्याण करा

By admin | Updated: February 6, 2015 00:54 IST

समर्पणसागर महाराज : महोत्सवासाठी सहकार्याबद्दल मानले आभार

बाहुबली : बाहुबली ब्रह्मचर्याश्रम विद्यापीठ व भगवान बाहुबली महामूर्तीचे प्रतिष्ठापक गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी दिलेल्या उपदेशानुसार संस्थेचे कार्य सुरू आहे. लौकिक प्रगतीसोबत धार्मिक भावनेसाठी होत असलेले प्रयत्न गरजेचे आहेत. सर्वांनी आचार व विचार पवित्र ठेवून जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी स्वयंस्फूर्त प्रयत्न करावे, असे आशीर्वचन क्षुल्लक समर्पणसागर महाराजांनी प्रवचनात दिले. १००८ भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा सर्व घटकांच्या सर्वोत्तम सहकार्याने यशस्वी झाला. त्याबद्दल समर्पणसागर महाराजांनी सर्वांचे आभार मानले.महोत्सवात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी महामस्तकाभिषेक कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी पू. १०८ गुरुदेव समंतभद्र महाराजांचे आशीर्वाद असल्याने हा समारंभ यशस्वी झाला. त्याशिवाय आचार्य वर्धमानसागर महाराज, श्रीभद्र महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, आर्थिक ज्ञानमती माताजी व आर्थिका मुक्ती लक्ष्मी माताजी व मुनी संघाच्या उपस्थितीत महोत्सव होणे अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. समाजातील दानशूर, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, बाहुबली विद्यापीठातील शाळांचे मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका, यांनी तीन महिने घेतलेले परिश्रम, पोलीस यंत्रणेने केलेले काटेकोर नियोजन, आरोग्य विभागाचे मदत केंद्र, लाखो भाविकांच्या आहाराची व्यवस्था करणारे गुरुकुल स्नातक, शासकीय अधिकारी, परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध सहकारी संस्था यांच्या परिश्रमाबद्दल समितीच्यावतीने आभार मानले. यावेळी डॉ. नेमिनाथ बाळीकाई यांच्या ‘बाहुबली इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी खा. दिलीप गांधी, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार वीरकुमार पाटील, समितीचे सहकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार संजय पाटील (बेळगाव), प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), रावसाहेब पाटील, सभापती राजेश पाटील, सरपंच माधवी माळी, बाळासाहेब गारे, जिल्हा परिषद सदस्य संतोष माळी, सरपंच विनोद कांबळे यांचा खासदार राजू शेट्टी, आमदार संजय पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, खासदार दिलीप गांधी, आमदार जयंत पाटील यांनी विचार मांडले.याप्रसंगी संचालक बी. टी. बेडगे, पी. एम. पाटील, सुभाष रजपूत, बलराम महाजन, रवींद्र खोत, रमेश देसाई, आप्पासोा चौगुले, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासोा चौगुले, अनिल भोकरे, प्रकाश पाटील, कलगोंडा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, धनराज बाकलीवाळ, सनतकुमार आरवाडे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, पी. ए. मगदूम, महावीर लठ्ठे, आप्पासाहेब भगाटे, रायचंद हेरवाडे, आदीं उपस्थित होेते.मेपर्यंत महामस्तकाभिषेक महोत्सवादरम्यान ज्यांना महामूर्तीवर अभिषेक करण्यासाठी उपस्थित राहता आले नाही अथवा अभिषेक करता आला नाही, अशा श्रावकांना संधी मिळावी यासाठी मे महिन्यापर्यंत प्रत्येक रविवारी मस्तकाभिषेकाचे आयोजन केले आहे. याचा लाभ श्रावकांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी केले आहे.