शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

'एलबीटी' रद्दचे व्यापाऱ्यांतून स्वागत

By admin | Updated: December 19, 2014 00:14 IST

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमधील व्यापारात वाढ होईल़ - राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा

कोल्हापूर : राज्यातील व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे भाजप सरकारने एलबीटी १ एप्रिल २०१५ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी एलबाटी अर्थात स्थानिक संस्था कर एप्रिलपूर्वी रद्द करण्याची घोषणा विधान परिषदेत केली आहे़ या निर्णयाचे स्वागत येथील व्यापाऱ्यांनी केले आहे़  राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा म्हणाले, एलबीटी रद्द झाल्यामुळे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमधील व्यापारात वाढ होईल़ एलबीटीमुळे शहराच्या हद्दीबाहेर वाढत चाललेल्या मार्केटचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना बसत आहे़. त्याला आळा बसेल़ एलबीटी रद्द झाल्यास व्हॅट, एलबीटीसाठी वेगवेगळी खाती व त्यातील क्लिष्टता कमी होण्यास मदत होईल़ केंद्र सरकारने एलबीटी रद्द करण्याची अंमलबजावणी लवकर करावी़विनापर्याय एलबीटी रद्द करावी, अशी आमची मागणी होती़ एलबीटी रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आता एलबीटीचा विषय मिटला आहे़ नागरिकांवर आणि व्यापारी या दोहोंचे नुकसान थांबले आहे़ आता युरोपच्या धर्तीवर ‘एक देश, एक कायदा’ याप्रमाणे जीएसटीची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, हा कायदा सुलभ असावा, अशी अपेक्षा आहे़ ‘जीएसटी’चे स्वरूप ठरल्यानंतर आम्ही याबाबतची भूमिका जाहीर करू़ जीएसटीचा कमाल दर १८ टक्के इतका असावा, पण जीएसटीच्या दरात सूट दिली, तर निर्यातवृद्धीसाठी फायदा होईल, असे मत कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी व्यक्त केले़ कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आनंद माने यांनी एलबीटी रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करताना एलबीटी रद्द झाल्यास ग्रामीण व शहरी मार्केटमध्ये वस्तंूचे दर समान राहतील़ त्यामुळे अवैध मार्गाने होणारी मालवाहतूक आपोआपच रोखली जाईल़ एलबीटीमुळे कर भरणाऱ्यांना त्रास आणि चोरांना मोकळीक, अशी स्थिती आहे़, त्याला आळा बसेल़ (प्रतिनिधी)'जीएसटी'ची प्रतीक्षाएलबीटीसह व्हॅट व सर्व्हिस टॅक्ससह संबंधित अन्य करांना सामावून घेणाऱ्या जीएसटीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा व्यापारीवर्गांतूून व्यक्त होत आहे़