शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीबद्दल पालकमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत

By admin | Updated: December 27, 2015 01:29 IST

भाजपकडून आनंदोत्सव : इच्छाशक्ती अन् मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे टोलमुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलेल्या ‘टोल’चा प्रश्न निकालात काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शनिवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून जल्लोष केला. इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. टोलमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांचे छत्रपती शिवाजी चौकात महानगर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत करून भव्य सत्कार केला. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो....’, ‘पालकमंत्री तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’, ‘केली रे केली भाजपने टोलमुक्ती केली...’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कॉँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असताना प्रशासकीय स्तरावर टोलमुक्तीचा निर्णय घेणे अत्यंत जोखमीचे होते; पण इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली. यासाठी भाजपचे सरकार व मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही कोल्हापुरात विकासाचे पर्व अशाच पद्धतीने पुढे चालत राहील. महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजप तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. रामभाऊ चव्हाण, अशोक देसाई, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, विजय जाधव, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, दिलीप मैत्राणी, सुभाष रामुगडे, संदीप देसाई, सुरेश जरग, गणेश देसाई, अ‍ॅड. संपतराव पवार, अमोल पालोजी, मधुमती पावणगडकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रभा टिपुगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)