शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांना अभिवादन

By admin | Updated: June 27, 2016 00:32 IST

१४२ वी जयंती : लक्ष्मी विलास पॅलेस येथे कार्यक्रम

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कसबा बावडा येथील शाहू महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळोखे, कोल्हापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, महापालिका स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक अशोक जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.अहो बंटी साहेब, जाऊ देकार्यक्रमास पालकमंत्री, पदाधिकाऱ्यांसह आमदार सतेज पाटील हेही उपस्थित होते. यादरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जन्मस्थळ परिसरात सोडल्या होत्या. मात्र, पोलिस निरीक्षकांनी या गाड्या बाहेर काढण्याचे आदेश दिले. आमदार पाटील यांची गाडीही बाहेर काढण्यात आली. कार्यक्रमानंतर सतेज पाटील यांना चालकाने आपली गाडी यांनी बाहेर काढल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी पोलिस निरीक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. पाटील यांनी एस.पीं.ना बोलवा, त्यांच्याशी मी बोलणार आहे, असे सांगितले. त्याचवेळी पालकमंत्रीही तेथे आल्यानंतर देशपांडे यांनी ‘अहो बंटी साहेब, जाऊ दे’ असे म्हणत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.