शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रग्बी खेळाडू वैष्णवी पाटीलचे जल्लाेषी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

कोल्हापूर : आशियायी आंतरराष्ट्रीय महिला रग्बी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील वैष्णवी दत्तात्रय पाटील हिचे ...

कोल्हापूर : आशियायी आंतरराष्ट्रीय महिला रग्बी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील वैष्णवी दत्तात्रय पाटील हिचे शुक्रवारी सायंकाळी ताराराणी पुतळ्याजवळ आगमन होताच जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गंगावेश रिक्षा मित्रमंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील हे तिचे वडील आहेत. यामुळे रिक्षा मित्रमंडळातर्फे शहरातून रिक्षाची मिरवणूक काढून तिचा गौरव करण्यात आला. मिरवणुकीत उघड्या टपाच्या जीपमध्ये ती उभी होती.

१८ वर्षांखालील महिलांच्या आशियाई रग्बी स्पर्धा १८ आणि १९ सप्टेंबरला ताश्कंद उझबेकिस्तान येथे झाल्या. या स्पर्धेत सहभागी भारतीय संघात वैष्णवी पाटील हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यानंतर तिचे पुण्याहून सायंकाळी कोल्हापूरला आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थ आणि गंगावेश रिक्षा मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हलगी, कैचाळाच्या निनादात लक्ष वेधण्यात आले. ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पळ करून मिरवणूक मार्गस्थ झाली. पाडळी खुर्द येथे वैष्णवी हिच्या घरी मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत सरपंच तानाजी पालकर, प्रकाश पाटील, दीपक पोवार, सागर पालकर, गणेश रावळ, सुवर्णा पाटील, माधुरी पाटील, कांचन पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

कोट

ग्रामीण भागातून येऊनही आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत यश मिळवले. यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. यापुढील विविध स्पर्धांतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.

वैष्णवी पाटील

फोटो : २४०९२०२१-कोल- पाटील मिरवणूक व पाटील मिरवणूक ०१

कोल्हापुरातील ताराराणी चौकात शुक्रवारी वैष्णवी पाटील हिचा ग्रामस्थ आणि गंगावेश रिक्षा मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष स्वागत करून शहरातून मिरवणूक काढली. दुसऱ्या छायाचित्रात मिरवणुकीत रिक्षा चालकांनी हलगीच्या निनादात नृत्य केेले.

छाया : नसीर अत्तार