शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘लेकी’च्या जन्माचे वाजतगाजत स्वागत

By admin | Updated: January 29, 2016 00:44 IST

शिवाजी पेठेतील साळोखे कुटुंबीय : मुलगा पाहिजे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन

कोल्हापूर : मुलगी झाली म्हणून नाके मुरडणाऱ्यांची संख्या आजच्या घडीला कमी नाही. अशा काळात मुलगी झाली म्हणून तिचे स्वागत गुरुवारी शिवाजी पेठेतील साळोखे कुटुंबीयांनी अगदी बँडबाजा आणि आकर्षक चांदीच्या रथातून मिरवणूक काढून केले. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ येथे राहणारे अ‍ॅड. योगेश साळोखे यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्या पोटी जन्मलेल्या ‘जिजा’ या मुलीचे स्वागत अगदी वेगळ्या प्रकारे केले. ‘जिजा’चा जन्म झाल्याने साळोखे कुटुंबीयांनी गेले तीन दिवस झाले घराला विद्युत रोषणाई केली आहे. यासह परिसरातील घरांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी हे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी मरगाई गल्ली येथील राजे संभाजी तरुण मंडळापासून ‘जिजा’ व तिची आई तेजस्विनी आणि मित्रमंडळींतील मुलींना कोल्हापुरी फेटे बांधून आकर्षक चांदीच्या रथातून व बँडबाजा वाजवीत मिरवणूक काढली. यावेळी बँडवर वाजविण्यात येणारी धूनही अगदी ‘लेक लाडकी’ अशा पद्धतीची होती. ही आगळीवेगळी मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व आबालवृद्ध उपस्थित होते. तेजस्विनी यांचे माहेर मरगाई येथील असल्याने योगेश यांनी पत्नीच्या घरापासून आपल्या घरापर्यंत ‘जिजा’ची मिरवणूक काढली.घरातील वातावरण अगदी मध्यमवर्गीय आहे. कुटुंबीयांचा म्हशीपालन हा मुख्य व्यवसाय आहे. कुटुंबात आमची पिढी उच्चशिक्षित आहे. त्यात आमच्या घरात मुलगी नसल्याने आमच्या सर्व कुटुंबीयांना मुलगीच हवी होती. माझी मुलगी ‘जिजा’ची मिरवणूक काढण्यासाठी मला कुटुंबीयांनीच प्रोत्साहित केले. माझ्या पत्नीसह तिच्या माहेरकडील नातेवाईक मंडळींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. - अ‍ॅड. योगेश साळोखे