कसबा बावडा : कसबा बावडा परिसरात घरगुती गणरायांचे शुक्रवारी सकाळी तर सार्वजनिक मंडळाचे सायंकाळी पाचनंतर मोठ्या उत्साहात आगमन झाले.
मुख्य रस्त्यावर सकाळपासूनच बाप्पांचे स्वागत करण्यासाठी झुंबड उडाली होती. काहींनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या गणरायाचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतशबाजीही करण्यात आली. सायंकाळनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचे आगमन झाले. बावड्यात रस्त्याच्या दुतर्फा गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सजली आहेत. याठिकाणी नवीन वस्त्रे, हारतुरे, पोवती, लाईटच्या माळा, दुर्वा, फुले-फळे, मिठाई आदी दुकानात गर्दी दिसून येत होती. काहींनी आपल्या रिक्षातून गणेशमूर्ती मोफत घरपोच देण्याची सेवा बजावली.
फोटो : १० बावडा गणेशमूर्ती
कसबा बावडा परिसरात घरगुती बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ठोंबरे मळ्यातील नागरिकांनी बैलगाडीतून बापाचे स्वागत केले.
---------------------------------------------