शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

गडहिंग्लजमध्ये वीकेंड लॉकडाऊन कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:23 IST

औषधे दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. ...

औषधे दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा काही महत्त्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

येथील दसरा चौक, बसवेश्वर पुतळा, कडगाव रोड याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांनीही घरीच राहणे पसंत केले. रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे आणि नेहमी गजबलेले रस्ते, चौक निर्मनुष्य होते.

दोन दिवसांवर गुढीपाडवा आहे. तरीदेखील लॉकडाऊनला व्यापार्‍यांसह सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनीही नियमांचे काटकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य केले.

फोटो ओळी - लॉकडाऊनमुळे गडहिंग्लज शहरातील नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या दसरा चौकात शनिवारी दिवसभर शुकशुकाट होता. (मजिद किल्लेदार)

बुगटे आलूरची गुरुदत्त यात्रा रद्द

गडहिंग्लज : बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथील गुरुदत्त देवाची शनिवारी (दि. १७) होणारी वार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द केल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.

दरवर्षी गुढीपाडवा ते पंचमी दरम्यान पाच दिवस यात्रा भरते. पालखी व सबिना मिरवणुकीला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. परंतु ,यावर्षी केवळ हक्कदार व मानकर्‍यांच्या उपस्थितीत उत्सवमूर्तीचे पूजन व अन्य धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पै-पाहुण्यांना आमंत्रित न करता घरीच साधेपणाने यात्रा करण्याचे आवाहन कमिटीने केले आहे.