शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

जमीन व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी वेबसाईट

By admin | Updated: September 5, 2015 00:16 IST

सतीश जोशी यांचा पुढाकार : मालमत्ता खरेदी करताना खबरदारीसाठी मार्गदर्शक

कोल्हापूर : जमीन खरेदी-विक्रीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पुणे येथील सतीश मुकुंद जोशी यांनी ६६६.स्र१ङ्मस्री१३८’ं६’ीं१ल्ल्रल्लॅ.ूङ्मे ही मराठीतील वेबसाईट स्वत:चे पैसे खर्च करून तयार केली आहे. आतापर्यंत या वेबसाईटला दोन हजारांवर लोकांनी भेट दिली आहे. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील अमृतसिद्धी अपार्टमेंटमध्ये जोशी राहतात. ते अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांनी जमीनविषयक कायदे, मार्गदर्शन या विषयांवर पुस्तक लेखन केले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जमिनीसंबंधीच्या चळवळींचा अनुभव असल्यामुळे त्यांनी मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणारी वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटसाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले असून, ही त्यांची दुसरी वेबसाईट आहे. सध्या सर्वत्र मालमत्तेच्या खरेदी-विक्री वाढली आहे. परिणामी, या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे जोशी यांनी ही वेबसाईट सुरू केली आहे.व्यवहारावेळी करावयाच्या कराराचे १०४ प्रकारचे इंग्रजी भाषेतील नमुने या वेबसाईटवर डाऊनलोड केले आहेत. याशिवाय मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे पाहणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे पाहावीत, घरबांधणीसाठी कोणती जागा योग्य आहे, कायद्यातील तरतुदी, मालमत्ता हस्तांतर अधिनियम - १८८२ कलम ५५, मालमत्ता खरेदीचे निकष याची सविस्तर माहिती या वेबसाईटवर आहे. खरेदी-विक्रीवेळी फसवणूक झालेल्या काही जणांची कथा रूपाने आॅडिओ क्लिपही या वेबसाईटवर आहे. (प्रतिनिधी)मालमत्ता खरेदी-विक्रीवेळी फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे सर्वच घटकांना उपयोगी होईल, अशी ही वेबसाईट सुरू केली आहे. अल्पावधीतच मोठ्या संख्येने लोकांनी या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेतली आहे. जमिनीविषयीच्या पुस्तकांनाही मागणी आहे. - सतीश जोशी, पुणे