शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तळंदगे पाणी योजनेचे काम कायद्याने पूर्ण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील पाणी याेजनेच्या अशुद्ध दाबनलिकेच्या कामाला कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध ...

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील पाणी याेजनेच्या अशुद्ध दाबनलिकेच्या कामाला कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सोमवार, दि. २७ सप्टेंबरला सर्व अधिकारी या ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा करतील. तरीही विरोध कायम राहिला तर कायदेशीर प्रक्रियेने हे काम पूर्ण करू असे लेखी पत्र मिळाल्यामुळे तळंदगे सरपंचांसह सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारीच मागे घेण्यात आले. यावेळी आमदार राजू आवळे उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तळंदगे येथे काही वर्षांपूर्वी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, अशुद्ध दाबनलिकेचे काम हे कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील हद्दीत येते. पाणंद परिसरातील या कामाला तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे ही पाणीयोजना पूर्ण झालेली नाही म्हणून सरपंच जयश्री भोजकर, सदस्य जयश्री शिरोळे, रूपाली कांबळे, जयश्री लोखंडे, कृष्णात पवार हे शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते.

यानंतर आमदार आवळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी कसबा सांगावचे सरपंच, कागलचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह संयुक्त पाहणी करून चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही विरोध कायम राहिल्यास कायदेशीरदृष्ट्या काम पूर्ण करून घेतले जाईल असे लेखी पत्र आमदार आवळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यांनतर आंदोलन मागे घेण्यात आले.

२४०९२०२१ कोल राजूबाबा आवळे

तळंदगे सरपंच, सदस्यांनी पाणी योजनेबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार राजू आवळे यांनी लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.