शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘गडहिंग्लज’च्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करावी

By admin | Updated: July 1, 2015 00:13 IST

विरोधी आघाडी : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४० लाख रुपये गुंतवून बसविलेली मशिनरी केवळ २० दिवस चालली. मशिनरी पुरविणाऱ्या मक्तेदारालाच ती मशिनरी चालविण्यास देण्यात आली आहे. या संशयास्पद व्यवहारात पदाधिकारी व प्रशासनाने संगनमताने अपहार केला आहे. त्यामुळे या ठेक्याची सखोली चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. यामुळे नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.निवेदनात म्हटले आहे, सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी विरोध नोंदविलेला असतानाही ग्रीन फे्रंडस इको मॅनेजमेंट सर्व्हिसेस, हिरलगे यांची या कामाची ४३ लाख ८८ हजार ६०१ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याचा करारही बेकायदा करण्यात आला. चाचणी अहवाल न पाहता या कामाचे बील अदा केल्यामुळे तांत्रिक लेखा परीक्षणाच्या अटींच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.३१ मार्च २०१४ पासून आजतागायत ही मशिनरी केवळ २० दिवस चालविण्यात आली. प्रतीदिन १० टन कचरा विघटनाची क्षमता असतानाही २० दिवसांत केवळ २२ टन मातीसदृश्य खत तयार झाले. तरीदेखील मक्तेदाराला ४३ लाख ३५ हजार ३१३ रुपयांचे बील अदा केले. मशिनरी चालविण्यासाठी त्याच मक्तेदारास प्रतिमहिना १,१६,५०० रुपये दराने १५ मार्च २०१५ रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे.ई-निविदेतील अट क्रमांक ८ नुसार निविदा धारकांना या कामाचा अनुभव नसल्यामुळे फेरनिविदा काढण्याची गरज होती. मात्र, १७ जून २०१३ च्या दरपत्रकाने फॅब्रिकेशन फर्म्सकडून दरपत्रक मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त तीन दरपत्रकांपैकी ‘ग्रीन फे्रंडस’चे ३९ लाख ९० हजारांचे दरपत्रक होते. त्याच दरपत्रकानुसार या कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेऊन चुकीच्या पद्धतीने पूर्वनियोजनानुसार काम दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे.शिष्टमंडळात नगरसेवक बसवराज खणगावे, दादू पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब वडर, राजेश बोरगावे, उदय पाटील व सरिता भैसकर यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)