शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

आम्ही नाटक बघणार आहोत, तुम्हीही बघा

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

‘शिवाजी अंडरग्राऊंड..’ : गडहिंग्लज येथे लोकशाही, समतावादीतर्फे प्रांतांना निवेदन

गडहिंग्लज : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकावर बंदीच्या मागणीसाठी काही संघटनांनी घेतलेले आक्षेप निराधार व चुकीचे आहेत. आम्ही नाटक बघणार आहोत. सर्व रसिकांनाही ते पाहण्याचे स्वातंत्र्य असून, तुम्हीही नाटक बघा आणि शिवरायांचे माणूसपण नव्याने समजून घ्या, असे आवाहन येथील लोकशाही व समतावादी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून नाटकाला विरोध करणाऱ्यांना केले आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे गडहिंग्लज येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या जनता खुले नाट्यगृहात ५ नोव्हेंबर २०१५ रोजी हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. त्या नाटकावर बंदी घालावी व नाट्यप्रयोग रद्द करावा, अशी मागणी शिवसैनिकांसह शिवप्रेमींनी केली आहे. त्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे, २०१२ मध्ये मराठी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचे महाराष्ट्रभर सुमारे १ हजार प्रयोग झाले आहेत. त्यास सेन्सॉर बोर्डाने रीतसर परवानगी दिली आहे. नाटकांत वापरलेल्या काही वस्तू व साधने प्रतीके म्हणून वापरण्यात आली आहेत. त्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न चुकीच्या समजुतीतून झाला आहे. सर्व लोकशाही, समता व बंधुताप्रिय रसिकांनी सहकुटुंब पाहावे असे हे सुंदर नाटक आहे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारे हे नाटक सर्वांनी शांतपणे पाहावे आणि खरे-खोटे, सत्य-असत्याची खात्री करावी, असे आवाहन केले आहे. निवेदनावर माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, प्रा. स्वाती कोरी, कॉ. उज्ज्वला दळवी, प्रा. प्रकाश भोईटे, रमजान अत्तार, आशपाक मकानदार, महेश सलवादे, कॉ. अशोक जाधव, पी. डी. पाटील, सुरेश पोवार, प्रा. रमेश तिबिले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)