कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे थेट वंशज कोण, यावर वाद आहेत का, महाराज आग्रा येथून स्वराज्यात नेमके कोणत्या मार्गाने परतले, महाराजांच्या पश्चात त्यांच्या इतर पत्नींचे काय झाले, अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देत राज्य मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी आपण सारेच शिवबाचे खरे वारसदार आहोत आणि आपले आयुष्य गडकिल्ल्यांशिवाय अपूर्ण आहे, असे स्पष्ट केले.
रंकाळा परिसरातील अद्वितीय अपार्टमेंटमध्ये विराजमान श्रीगणेशासमोर गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अडके बोलत होते. अध्यक्षस्थानी कोकण रेल्वेचे अधिकारी पी. एन. पाटील होते. प्रारंभी उपाध्यक्ष राहुल दुखंडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात डॉ. अडके यांनी उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
छत्रपती शिवरायांचा मृत्यू, स्वराज्यात त्यांनी मिळविलेले किल्ले, आग्राहून सुटका, बाल संभाजी, हिरोजी इंदूलकर, मदारी म्हेतर, नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे असे शिवरायांचे शिलेदार, रायगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांची बांधणी करणारे स्थापत्य अभियंता, गडकिल्ल्यांबरोबरच समुद्रावर राज्य करणारा राजा, औरंगजेबाला त्याच्याच राजधानीत खडे बोल सुनावणारा एकमेव मराठा अशा अनेक पैलूंवर डॉ. अडके यांनी भाष्य केले. बालपणीच गडकिल्यांची आवड निर्माण करणारे गो. नी. दांडेकर यांच्यासह अनेकांमुळे दुर्गभ्रमंती सुरू केली. पुढेही सुरू राहील असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. अनेकांचे एकाकी जीवन दुर्ग, अरण्य भ्रमंतीमुळे सुसह्य झाले, असेही ते म्हणाले.
अलीकडे गणेशोत्सवात रेकॉर्डडान्स आणि डॉल्बीवर नृत्य करण्याचे कार्यक्रमच आयोजित केले जातात. मात्र, हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यामागे लोकप्रबोधनाचा लोकमान्य टिळकांचा हेतू कालबाह्य होत चालल्याची खंत यावेळी डॉ. अडके यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन रूपेश लोटलीकर यांनी केले होते. यावेळी अध्यक्ष सुरेश तलरेजा, सचिव सत्यजित सावंत, प्रफुल्ल गायकवाड उपस्थित होते. आनंद म्हाळुंगकर यांनी आभार मानले.
--------------------------------------------
फोटो : 17092021-Kol-Amar aadke
फोटो ओळ : रंकाळा परिसरातील अद्वितीय अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अमर अडके यांनी संवाद साधला. यावेळी पी. एन. पाटील उपस्थित होते.
170921\17kol_6_17092021_5.jpg
फोटो : 17092021-Kol-Amar aadkeफोटो ओळ : रंकाळा परिसरातील अद्वितिय अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अमर अडके यांनी संवाद साधला. यावेळी पी. एन. पाटील उपस्थित होते.