शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगरात अनधिकृत झोपड्यांवर वरवंटा

By admin | Updated: March 20, 2016 01:06 IST

महापालिकेची कारवाई : मोठा पोलिस बंदोबस्त; मोजणी करून २८२ झोपड्यांवर कारवाई सुरू

कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरात विविध कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अनधिकृत झोपड्या शनिवारपासून पोलिस बंदोबस्तात काढण्याची कारवाई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली. शनिवारी दुपारपर्यंत सुमारे ५० हून अधिक झोपड्या काढण्यात आल्या. या कारवाईवेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस बंदोबस्त असल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. राजेंद्रनगर परिसरात केएमटी बस टर्मिनन्स, माध्यमिक शाळा, तसेच चाळीस फुटी डी. पी. रोड यासाठी आरक्षित जागा आहेत. त्याच्या आसपासच्या परिसरात शहरातील अन्य भागांतील विस्थापित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना कायमस्वरूपी घरेही बांधून देण्यात आली आहेत; परंतु पुन्हा याच लोकांनी बस टर्मिनन्स, माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून पत्र्यांच्या शेडवजा झोपड्या उभ्या करून त्यामध्ये गोदामे केली होती. विशेष म्हणजे, रस्त्यातही त्यांनी अतिक्रमण केले होते. महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येताच त्या भागाची पाहणी करून अनधिकृत झोपड्याची मोजणी केली होती. मोजणीवेळी माध्यमिक शाळेच्या जागेवर १३२, डीपी रोडवर ११३, केएमटीच्या जागेवर ३१, तर रहिवाशी क्षेत्रात ६ अशा झोपड्या अनधिकृत उभ्या राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या झोपड्या निष्काषित करण्याचा निर्णय विभागीय कार्यालयातर्फे घेण्यात आला होता. शनिवारी सकाळी उपशहर अभियंता एस. के. माने आवश्यक तो पोलिस बंदोबस्त, वाहने, डंपर, जेसीबी अणि सुमारे १०० हून अधिक कामगार असा फौजफाटा घेऊन राजेंद्रनगर परिसरात गेले. आतील महत्त्वाचे साहित्य काढून घेण्यात आल्यानंतर झोपड्या तोडण्यास सुरुवात करण्यात आली. बघता बघता एकापाठोपाठ एक पत्र्याची शेड जेसीबीच्या धक्क्याने जमीनदोस्त झाली.