शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांसाठी दाेडामार्गच्या जंगलात तयार केला पाणवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:19 IST

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या परिसरातील केर गावामधून पाच किलोमीटर डोंगरावर जाऊन "नेत्याचे पठार" येथे गाळ व चिखल काढून ...

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या परिसरातील केर गावामधून पाच किलोमीटर डोंगरावर जाऊन "नेत्याचे पठार" येथे गाळ व चिखल काढून निसर्गप्रेमी मित्रांनी वन्यजीवांसाठी मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणवठा तयार केला.

उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढत जातो, तसे वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडे पडतात. यामुळे वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होतात आणि मग पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळतात. असे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात, तर काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होतात. एखाद्‌दुसरा वन्यप्राणी आपला अधिवास सोडल्याने शिकाऱ्यांकडून शिकार होतो.

यासाठी या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी मिळावे व त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी यासाठी दोडामार्ग येथील निसर्गमित्रांनी जंगलात पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या हंगामात त्यांनी तीन डोंगराळ पाणवठे तयार केले आहेत.

जंगलात पाणवठे तयार करण्याच्या मोहिमेत निसर्गप्रेमी संजय सावंत यांच्यासोबत तुषार देसाई, अमित सुतार, संजय नाटेकर, संकेत नाईक, अनुराग सिनारी, विकास देसाई, अनिरुद्ध देसाई यांनी सहभाग घेतला.

कोट

या पाणवठ्याच्या परिसरात अनेक दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ फुलपाखरे, खवले मांजराने वाळवीसाठी ओरखडलेले वारूळ, तसेच सांबर, गवे, भेकर, बिबट्या, वाघाचीही विष्ठा आढळली आहे. हे आपल्या समृद्ध जैवविविधतेचे द्योतक आहे. आपल्या संविधानानुसार नद्या, सरोवरे, वने, अरण्ये वगैरेसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. प्रत्येक गावाच्या तरुण मंडळांनी असे विधायक उपक्रम राबविल्यास अनेक पशु-पक्ष्यांना लुप्त होण्यापासून आपण वाचवू शकतो.

- संजय सावंत,

निसर्गप्रेमी, तिलारी, जि. सिंधुदुर्ग.

(फोटो : ३११२२०२०-कोल-पाणवठा, ३११२२०२०-कोल-निसर्गमित्र दोडामार्ग)