शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 4, 2016 00:37 IST

नागरिकांची धावपळ : ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने व्यत्यय

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे शहरातील ए, सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे खंडित झाला. सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, त्यात पुन्हा तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणी मिळाले नाही. १ एप्रिलपासून शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. याचे योग्य नियोजन झाले असल्याने पाणीटंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत आहे. परंतु, गुरुवारी सायंकाळी शहर परिसरात जोरदार वाऱ्यापाठोपाठ विजांचा कडकडाट आणि वळीव पाऊस पडल्याने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन अचानक जळाला. या अनपेक्षित घटनेने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील प्रक्रिया झालेले पाणी चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत सोडले जाते. त्यासाठी हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला होता. चंबुखडीची टाकी रात्रभर भरली जाते आणि पहाटे तीन वाजल्यापासून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे ही टाकीच भरता आली नाही. परिणामी, शहरातील ए, सी व डी अशा तीन प्रमुख वॉर्डांना शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. या तीन वॉर्डांत सुमारे साडेतीन ते चार लाख लोकवस्ती आहे.महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे चंबुखडी येथील टाकी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आज, शनिवारपासून शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, असे मनपा जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात गुरुवारी पाणी मिळाले नाही, त्या भागातील नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही पाणी मिळाले नाही. त्यामुळे उन्हाळा संपता संपता शहरवासीयांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागली. दरम्यान, ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, तेथे टॅँकरद्वारे पाणी देण्यात आले. परंतु, त्यावरही मर्यादा होत्या. (प्रतिनिधी)वळीव पावसाने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के. व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन जळाला.गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले.