शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यासह उपनगरांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:53 IST

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांच्या गळत्या काढण्यासाठी पालिकेने पाणी उपश्यावर बंदी आणली आहे. महिन्याभरात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची भीषणता जाणवणार हे मात्र निश्चित.जुलै महिन्यात आठवडाभर पाऊस चांगला झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. आता पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी पाणी मिळणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.कळंबा तलावातून कळंबा ग्रामपंचायत १४ एचपी मोटारीद्वारे रोज दहा तास पाणी उपसा करते. उपनगरांसाठी तलावातून कळंबा फिल्टर हाऊसमध्ये चोवीस तास पाणी उपसा होतो. पुढे हे पाणी बी वॉर्ड, मंगळवार पेठेत वितरित होते. यातील पाणी सुभाषनगर पंपिंग स्टेशनमध्ये सोडून आर. के. नगर, मोरेवाडी, सुभाषनगर, वर्षानगरास वितरित होते.गतवर्षी जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून तलावातील प्रचंड गाळाचा उपसा करण्यात आला. यंदाही मागेल त्याला गाळ योजनेंतर्गत गाळ उपसा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ उपसा होऊन पाणीसाठा क्षमता वाढली. गतवर्षी अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला; पण तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे जाणाºया माळवाडी व कात्यायनी कॉम्पलेक्स येथील जलवाहिन्यांच्या गळत्या न काढल्याने मार्चमध्ये पाणीपातळी सात फुटांवर आली. परिणामी, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उपसा करून कळंबा उपनगराची तहान भागविण्यात आली.सध्या महापालिकेने गळत्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पाणी उपशावर बंदी आणली आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीसच पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तलावात अवघा सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढे पाऊस न पडल्यास पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.तलावाचे भवितव्य प्रशासनाच्या हातीकळंबा गाव पाण्यासाठी पूर्णत: पालिकेवर अवलंबून आहे. ग्रामस्थ पालिका मालकीच्या कळंबा तलावाचे अथवा पुईखडीचे पाणी वापरतात. पण तलाव प्रदूषित होऊ नये, याची काळजी कोणी घेत नाही. तलावाचा वापर जनावरे धुणे, आंघोळीसाठी होतोय. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामांनी तलावाचा श्वास गुदमरतोय. आज तलावाचे भवितव्य ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाच्या हाती आहे.