शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी मुरगूड नगरपालिकेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:57 IST

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही ...

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता यांच्यासह तब्बल १६ नगरसेवकांनी राजीनामे दिले, तरसंतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाब विचारत पालिकेला टाळे ठोकले. नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. शुद्ध आणि योग्य दाबाने सुरळीत पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंंत नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना पालिकेत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी सर पिराजीराव तलावातून पाणी पुरवले जाते. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी होत्या. वेळोवेळी याबाबत प्रशासनाने नागरिकांना आश्वासने दिली होती; पण या समस्येबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष होता.सोमवारी सकाळी संतप्त नागरिक नगरपालिकेच्या आवारात जमले. यावेळी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही कार्यालयात उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यावेळी उपनगराध्यक्ष मेंडके यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पालिकेसमोर मुख्याधिकारी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.यावेळी नामदेवराव मेंडके यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गटाची बदनामी होत आहे. आम्ही सुचविलेल्या मुद्द्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आपण राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नगरसेवक कार्यालयात गेले आणि एकत्रितपणे राजीनामा तयार करून ते गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले, धनाजीराव गोधडे, दीपक शिंदे, संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, हेमलता लोकरे, रेखा मांगले, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत या मंडलिक गटाच्या, तर पाणीपुरवठा समितीचे सभापती रविराज परीट व विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर यांनी राजीनामे दिले.टाळे टोकताना सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, गुंड्या चव्हाण, युवराज सूर्यवंशी, सुनील चौगले, सर्जेराव पाटील, आबासो खराडे, भारत भाट, सुशांत मांगोरे, आनंदा मांगले, आदी उपस्थित होते.अहवालात प्रशासनावर ठपकादरम्यान, शहराला पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी, तसेच सर पिराजीराव तलावातील पाणी आणि वेदगंगा नदीतील पाणी तपासण्यासाठी बंगलोरमध्ये पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये तलावातील आणि नदीतील पाणी पिण्यास योग्य आहे, पण पालिकेच्या फिल्टरमधून शहरात जाणारे पाणी मात्र पूर्णपणे आरोग्यास घातक असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसमध्येच दोष असल्याचे अधोरेखित होते.