शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेला जलपर्णीची लागण

By admin | Updated: December 26, 2014 00:53 IST

तेरवाड बंधारा : वेळीच जलपर्णी हटावची मोहीम आवश्यक

गणपती कोळी - कुरुंदवाड -पंचगंगा नदीत उन्हाळ्यात प्रदूषित पाण्याबरोबर जलपर्णीही प्रमुख समस्या बनते. उन्हाळ्यापूर्वीच नदीमध्ये जलपर्णी डोके वर काढत असून, हळूहळू नदी व्यापत आहे. तेरवाड बंधारा आदी ठिकाणी तिचे अस्तित्व दिसत आहे. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून जलपर्णी हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे.पंचगंगा नदी शिरोळ, हातकणंगले तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र, या नदीकाठावर वाढलेले औद्योगिकीकरण, कोल्हापूरसह इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे. या नदीमध्ये उन्हाळ्यात धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने व सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाण्याचा प्रवाह वाढल्याने विशेषत: उन्हाळ्यात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनते. या दूषित पाण्याबरोबरच जलपर्णीची समस्या गंभीर बनत आहे. हिवाळ्यामध्ये जलपर्णीचे पाण्यात रोपण होऊन नदी संपूर्ण जलपर्णीने व्यापून टाकते. सुमारे चार ते पाच फूट जाडीचा थर तयार होतो. नदीत पसरलेल्या जलपर्णीच्या बियाणांचे रोपामध्ये रूपांतर होत आहे. जलपर्णी पाण्यावर येत असून, हळूहळू संपूर्ण नदी व्यापत आहे. जलपर्णीने एकदा घट्ट आवळले की, ती हटविणे शक्य होत नाही. त्यासाठी पावसाळ्यातील महापुराचीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.