शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 24, 2016 01:01 IST

हॉकी स्टेडियमजवळील प्रकार : नागरिकांतून संताप; काम युद्धपातळीवर सुरू

कोल्हापूर : राज्य दुष्काळाने होरपळत असताना कोल्हापुरात मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे दररोज अनेक ठिकाणी लाखो लिटर पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. रिंगरोडवर ठिकठिकाणी लागलेल्या पाणी गळतीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियमनजीक लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर महानगरपालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे आयसोलेशन हॉस्पिटल, जवाहरनगर, नेहरूनगर परिसरावर त्याचा परिणाम होऊन या भागातील पाणीपुरवठा आज, रविवारीही बंद राहणार असून, तो उद्या, सोमवारी सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य दुष्काळाच्या छायेत आहे, पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. एकेकाळी संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावातील पाणी प्रथमच संपले आहे, तर राधानगरी धरणातील पाणीसाठाही जूनअखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने घेतले आहे, पण तरीही शहराच्या रिंगरोडवर मुख्य जलवाहिनीची चाळण झाल्याने त्यातून ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणची गळती काढण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आल्याने त्यांनी पाणी थेट गटारीत सोडले आहे. संभाजीनगर ते सायबर कॉलेजकडे जाणाऱ्या रिंगरोडवर हॉकी स्टेडियमनजीक शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात होते. या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पाण्यातून मार्गस्थ होताना पावसाळ्याचा भास होत होता.जाग आल्यानंतर प्रशासनाने धाव घेत या जलवाहिनीचा पाणीपुरवठा प्रथम बंद करून दुुरुस्तीचे काम सुरू केले. आज, रविवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. फुलेवाडी रिंगरोडवरीलही ठिकठिकाणी लागलेली गळती काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शुक्रवारी नवीन वाशी नाका येथील गळती काढली.