शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

इचलकरंजीत पाणीपुरवठ्याचे व्हॉल्व्ह बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST

इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे अनेक व्हॉल्व्ह धोकादायक स्थितीत आहेत. हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध असल्याने पादचारी व ...

इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे अनेक व्हॉल्व्ह धोकादायक स्थितीत आहेत. हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध असल्याने पादचारी व वाहनचालकांना याचा खूपच अडथळा होत आहे. व्हॉल्व्हला ठेच लागून अनेक नागरिक जखमी होत असून, वाहनचालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. व्हॉल्व्हच्या बाजूने मोठा खड्डा निर्माण झाल्याने ते धोकादायक बनत आहेत. त्यामुळे त्वरित यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहरातील प्रांत कार्यालयाजवळ, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, पंचवटी चित्रमंदिर, राजाराम स्टेडियम, नगरपालिका आदी ठिकाणी पाणी साठ्याकरिता नगरपालिकेने जलकुंभे उभारली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालिकेने सबपंप योजना कार्यान्वित केली आहे. भूमिगत पाईपलाइनद्वारे जलकुंभातून पाणी साठवण्यात येते. पाण्याची विभागणी सम प्रमाणात होण्यासाठी अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत; मात्र हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमधच जवळपास अर्धा फूट उंचीवर आल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीमुळे दिवसेंदिवस व्हॉल्व्हच्या बाजूचा खड्डा वाढतच असल्याने आणखी धोका निर्माण होत आहे.

शहरातील प्रांत कार्यालय चौकात व गुजरी पेठ कॉर्नरजवळ रस्त्यात मधोमध व्हॉल्व्ह असल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे प्रांत कार्यालय चौकातील व्हॉल्व्हला बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहे. या व्हॉल्व्हचा वाहनांना अडथळा होत असल्याने मोटारींचे गेअरबॉक्स व पेट्रोल टाक्या फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही परिसरातील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असून, पाणीही वाया जात आहे. हे व्हॉल्व्ह नियमानुसार जमीन लेव्हलला असणे गरजेचे आहे ; पण ते अर्धा फूट वर दिसून येत आहेत. अंधार पडल्यावर तर ते अजिबात दिसून येत नाहीत या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे.

चौकट

प्रशासनाला जाग कधी येणार ?

शहरातील प्रांत कार्यालय चौकातील व गुजरी पेठ कॉर्नरजवळील व्हॉल्व्ह अनेक दिवसांपासून धोकादायक परिस्थितीत आहेत. शहरातील प्रमुख मार्ग असून, दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते; मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखादा मोठा प्रसंग घडल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

फोटो ओळी

०४०७२०२१-आयसीएच-०२

प्रांत कार्यालय चौकात मध्यभागी व्हॉल्व्हचा खड्डा दुरुस्त करण्यासाठी बॅरिकेड्‌स लावून ठेवले आहेत.