शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा तीस टक्क्यांनीकमी

By admin | Updated: February 28, 2016 00:27 IST

शहरातील परिस्थिती : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी घटली ; पुरवठा विस्कळीत

कोल्हापूर : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असून, शहराच्या ए, बी तसेच ई वॉर्डांतील पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. उद्या, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जलसंपदा विभागाने दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणातील पाणी भोगावती व पुढे पंचगंगा नदीत सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली. शिंगणापूर बंधाऱ्याजवळ ही पातळी कमी झाली. त्यामुळे पाणी उपसा कमी झाला. या बंधाऱ्याजवळील चार पंपांपैकी दोनच सुरू आहेत, तर कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्राकडे जलवाहिनीद्वारे नेण्यात येणाऱ्या पाण्यातही पंचवीस टक्के कपात झाली. त्यामुळे पुईखडी व कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी वॉर्डांतील पूर्ण भाग आणि ई वॉर्डातील निम्म्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. तेथे कमी दाबाने कमी पाणी मिळाले. राधानगरीतून ५०० क्युसेक्स पाणी सोडले असून, ते शनिवारी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत येईल. सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. टँकरने पुरवठा : दोन वॉर्डांत परिणाम नाही बालिंगा उपसा केंद्राकडे नागदेववाडी डोहातून पाणी घेण्यात आले, त्यामुळे बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्यामुळे ए वॉर्डाचा काही भाग तसेच सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठ्यावर कसलाही परिणाम जाणवला नाही. विशेषत: ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, त्या भागात मागणी होताच पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देण्यात येते होते. एकूण आठ टॅँकर त्यासाठी तैनात करण्यात आले होते. जरी पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असली तरी त्याची फारशी तीव्रता शहरवासीयांना जाणवली नाही.