शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मुरगूडला आठवड्यातून तीनच दिवस पाणीपुरवठा

By admin | Updated: October 20, 2015 23:45 IST

सर्वपक्षीय ग्रामसभेत झाला निर्णय : श्रमदानातून होणार सर पिराजीराव तलावाची स्वच्छता

मुरगूड : पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने मुरगूड शहरासह यमगे शिंदेवाडी गावांना पिण्याचे पाणी पुरवणारा सर पिराजीराव तलाव भरलेला नाही. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी बोलावलेल्या ग्रामसभेत पाणी वाचविण्यासाठी शहराला तसेच यमगे, शिंदेवाडी गावांना आठवड्यातून तीनच दिवस पिण्याचे पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला. पुढील आठवड्यापासून त्याची अमंलबजावणी होणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेखा सुधीर सावर्डेकर होत्या. पाणीपुरवठा समितीचे सभापती संतोष कुमार वंडकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सर पिराजीराव तलाव भरण्यासाठी अवचितवाडी, चिमगाव, आदी गावांच्या नागरिकांनी योगदान दिल्याचे सांगून, मार्च, एप्रिल २०१६ मध्ये पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. वर्षअखेरीस पाणी योजना राबविणार असून, महिना अखेरीस सर्व नळांना मीटर बसविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दलितमित्र डी. डी. चौगले यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगून मुरगूड शहराला पाण्याची समस्या कधीच भेडसावली नसल्याने पाण्याची किंमत नागरिकांना माहीत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करावे. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके म्हणाले, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून, पालिकेने कठोर पावले उचलण्याचा प्रयत्न करावा. मुख्याधिकारी बी. एस. जगताप, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शहा, समोनाथ यरनाळकर, जयवंत हावडा, डा. संजय वडेर, पांडुरंग पुजारी, हाजी धोंंडिबा मकानदार, सूर्यकांत खराडे, धोंडिराम शिंदे, आदींनी सूचना मांडल्या. सभेस उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, विरोधी पक्षनेता किरण गवाणकर, अनंत फर्नांडीस, विलास गुरव, सुहास खराडे, दगडू शेणवी, सुधीर सावर्डेकर, बजरंग सोनुले, दिग्विजय पाटील, रोटरीचे अध्यक्ष बी. एस. खामकर, किरण कुंभार, नामदेव भांदिगरे, प्रकाश पोतदार, अनिल गंदमवाड, अमर कांबळे उपस्थित होते. दगडू शेणवी यांनी आभार मानले. (वार्ताहर) मुख्याधिकाऱ्यावरू तू-तू, मै-मै --माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी मुख्याधिकारी बी. एस. जगताप हे हजर नसतात, असा आरोप करून त्यांनी जबाबदारीने वागावे असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे काम याबाबतची माहिती संतोष वंडकर यांच्यासह प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितली. शहरातील महत्त्वाच्या योजना पूर्ण होण्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगून विनाकारण गैरसमजुती पसरवू नका, असे आवाहन पाटील यांनी केले.