जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस आहे.
काळम्मावाडी धरणात आजअखेर ९८.२० टक्के म्हणजेच २४.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या जल विद्युत केंद्रातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री उशिरा विसर्ग वाढविण्यात येणार असून, सतर्कतेचा इशारा दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांना देण्यात आला आहे. दूधगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी दिवसभर १७ मि.मी. पाऊस नोंद झाली, तर काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात आजअखेर २९२१ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २६ टी.एम.सी. इतकी असून आजअखेर पाणीसाठा २४.९३ टी.एम.सी. (९८.२० टक्के ) इतका झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.