शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडीत पाण्याची टंचाई

By admin | Updated: April 13, 2016 23:39 IST

पाच दिवसांतून पाणी : नळयोजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विजयकुमार कांबळे--अडकूर (ता. चंदगड) परिसरातील विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडी या गावांत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्याने तहानलेली माणसे रानोमाळ भटकंती करत वणवण फिरत आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्यांनी आपली दुधाळ जनावरेही कवडीमोल दराने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावा-गावांतील दूध संस्थांचे संकलनही कमी झाल्याने दूध संस्थाही बंद पडण्याची वेळ आली आहे.विंझणे : अडकूरपासून २ कि.मी. अंतरावर डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले विंझणे हे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम १२००. या गावाला इनामदारांचे गाव म्हणूनच ओळखले जात होते. येथील १९२७ मध्ये बांधलेला ‘राम-निवास’ हा इनामदारांचा वाडा याने गावच्या वैभवात भर पडली आहे, परंतु याच गावाला पिण्याच्या पाणीटंचाईने ग्रासले आहे. गत तीन महिन्यांपासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहेत. गावातील जुनी नळपाणी योजना आहे, परंतु त्या विहिरीला पुरेसे पाणी मिळत नाही. म्हणून नव्यानेच घटप्रभा नदीवरून जॅकवेल बांधून ३ कि.मी. अंतरावरून ९५ लाखांची योजना राबविली आहे. परंतु, ठेकेदार आणि वीजमंडळाच्या गलथान कारभारामुळे योजना रखडली आहे. मोरेवाडी : विंझणे गावापासून जवळच असलेलं डोंगराच्या मध्यभागी वसलेलं मोरेवाडी हे गाव. प्रतिवर्षी शासकीय पातळीवरील लाखो रुपयांच्या पाणी योजना राबविल्या जातात, परंतु वर्षाच्या आत कोलमडतात, अशी स्थिती या गावाची आहे. नदीवरून जॅकवेल बांधून गावात पाणी आणावे अशी सूचना शासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळींनी मोरेवाडीच्या गावपुढाऱ्यांना केली. मात्र, १५ टक्के निधी म्हणजेच लोकवर्गणी भरायची कुणी? शिवाय नदीवरून आणलेल्या मोटारीचे बिल कसे भरायचे? या अनेक प्रश्नांमुळे मंजूर झालेली जलस्वराज्य योजनाच ग्रामस्थांनी रद्द केली.गावातील पाच तलावाजवळ खुदाई केलेल्या बोअरवेलला मुबलक पाणी लागले आहे, परंतु ते पाणी दूषित आहे. त्या पाण्याने अंघोळ केली तर केस चिकटतात. जनावरे तर ते पीतच नाहीत. सध्या येथील पाटील यांच्या मालकीच्या बोअरवेलचे पाणी अधिग्रहण केले आहे. हे पाणी गावच्या टाकीत सोडून २ दिवसांतून एकदा ग्रामस्थांना मिळते, तर प्रत्येकाला सहा घागर पाणी मोजून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या शिपायावर आली आहे.सत्तेवाडी: शिरोली पैकी सत्तेवाडी या गावातही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिरोलीच्या डोंगराकडून येणारे सायफनचे पाणी झरा कमी झाल्याने भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांसह पुरुषांना व लहान बालकांना शेती शिवारातून पायपीट करावी लागत आहे. घटप्रभा नदीवरून आणलेली नळपाणी योजना पूर्ण केली आहे. मात्र, वीजखात्याच्या काही तांत्रिक कारणामुळे ही योजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जि. प.चे अडकूर विभागाचे सदस्य तात्यासाहेब देसाई यांच्या शेतातील बोअरवेलचे पाणी आता ग्रामस्थांची तहान भागवत आहे. रखडलेल्या पाणी योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.