शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 20, 2023 19:35 IST

'किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये'

कोल्हापूर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली असून नदी, धरण व जलाशयांमधील पाणी पातळीदेखील खोल गेली आहे, त्यामुळे आता फक्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून शेतीला पाणी देता येणार नाही तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी केले तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असून धरण व जलाशयांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तसेच उपसाबंदी जाहीर केली आहे. या परिस्थितीचा, संकटाचा सर्वांनी मिळून सामना करुया. शेतकऱ्यांनी किमान ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. याबाबत अधिक माहिती हवी असेल तर शंका असेल तर कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अफवा किंवा समजुतीच्या आधारावर पेरणी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत ५ टक्के पाऊसजिल्ह्यात सरासरी १९७१.१० मिलीमीटर पाऊस होतो पण एप्रिल व मेमध्ये वळीव न झाल्याने जमिनीच्या मशागती पूर्ण झाल्या नाहीत. जूनमध्ये ३६७.९० मिलीमीटर पाऊस होतो पण आजवर फक्त १८.० मिलीमीटर म्हणजे ५ टक्केच पाऊस झाला आहे. आधीच पेरणी केली व पुरेसा पाऊस झाला नाही तर पीक धोक्यात येऊ शकते. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरा विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७ टक्के पेरणीजिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर असून त्यात भात, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच गाळप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ९० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी तर शिरोळ, हातकणंगलेमध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुगाची पेरणी केली जाते. १४ जूनपर्यंत १२ हजार ५१९ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी