शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पाण्यासाठी पाचगावकर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:44 IST

शिवसेनेचे आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग

पाचगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून पाचगाव व उपनगरांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पाचगाव ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पाचगावच्या नागरिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.सकाळी दहा वाजता पाचगाव ग्रामपंचायतीपासून पायी मोर्चाला सुरुवात झाली. महिला रिकाम्या घागर, बादल्या डोक्यावर घेऊनच सहभागी झाल्या होत्या. ‘पाणी नको विष द्या’ असे घोषणा फलकही महिलांनी आणले होते. सुमारे १२ किलोमिटरचा पायी दोन तास प्रवास करीत हजारो मोर्चेकऱ्यांनी पाणी प्रश्नावर घोषणा देत जिल्ह्याधिकाऱ्यांकडे दाद मागितली.यावेळी संजय पवार यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली. राजकीय श्रेयवादासाठी पाचगावकरांना पाण्याची ढाल न बनविता जनतेला लवकरात लवकर पाणी मिळावे, हा त्यामागचा उद्देश घेऊन शिवसेना प्रामाणिकपणे लढत असल्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी तातडीने मंजूर करून घेतल्यास केवळ दोनच महिन्यांत पाचगावचा पाणीप्रश्न निकालात निघेल, असे पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, आतापर्यंत पाचगावसाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली आहे. पाण्यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला असून, पाचगावसाठी अजून काही लागणार असेल, तर आमची मदत करण्याची तयारी आहे. या अगोदर आम्ही कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून लागणाऱ्या निधीसाठी विचारपूस केली आहे; परंतु जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेची मुदत जून २0१६ पर्यंत असल्याने त्यासाठी एप्रिलपर्यंत वेळ लागू शकतो; परंतु आपल्या मागणीनुसार आम्ही येत्या ३१ डिसेंबरला जीवन प्राधिकरण व पाणी योजना संबंधातील सर्वांना एकत्र बोलावून, सभा घेऊन उपाययोजना म्हणून दहा लाखांची तात्पुरती पाणीयोजना मार्गी लावून पाठपुरावा करण्यात येईल. पाचगावसाठी खास कोट्यातून निधी आणण्यावर चर्चा करण्यात येईल. आणखीन काहीतरी अधिग्रहण करीत पाण्याची उपलब्धता करून देण्यात येईल. महानगरपालिकेकडून पाण्याची उपाययोजना करून त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी सांगितले की, नऊ कूपनलिका अधिग्रहण काराव्यात, असे ग्रामपंचायतीला कळवून पत्राद्वारे आदेश दिले आहेत; परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उर्वरित कूपनलिका अधिग्रहित करून दिल्या जातील. त्यासाठी सत्ताधारी मंडळींनी थोडी मदत करणे गरजेचे आहे, असे सांगताच सैनी यांनी सांगितले की, सरपंच जर मदत करीत नसतील, तर त्यांना बोलावून कायदा सांगावा.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील, पाचगाव शाखेचे आदित्य शेळके, दिगंबर पाटील, विकी काटकर, रितेश डोकरे, सागर पंतोडी, मेघाताई पाटील, आशा पिसाळ, गीता जोशी, सुवर्णा मिठारी तसेच नागरिक व महिला उपस्थित होते.मोर्चातील मागण्या...पाणीप्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमचा तोडगा काढावा. पुढील १५ ते २0 वर्षांतील लोकसंख्येचा विचार करून योजना राबवावी.थेटपाईपलाईन योजनेतील पाणी काही प्रमाणात पाचगावमधील जनतेला पुरवठा करता येईल, याबाबतचा सर्व्हे प्रशासनाने करावा.सध्या पाचगावमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांच्या जीवन प्राधिकरणाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ६0 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी केवळ तीन कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर ही पाणी योजना पूर्ण होण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर द्यावा.