शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे पाणी गेले आरगपर्यंत

By admin | Updated: February 21, 2016 23:55 IST

टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : उद्या सलगरे, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार

मिरज : म्हैसाळ योजनेतून सोडण्यात आलेले पाणी आरग येथील चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी सलगरे येथे पाचव्या टप्प्यापर्यंत व तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पंपांसह तीन टप्प्यातील १४ पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे म्हैसाळ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता व पाणी टंचाईमुळे पिके धोक्यात आल्याने वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रूपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. या रकमेत एक महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा, दुसऱ्या टप्प्यातील ४, तिसऱ्या टप्प्यातील ४ पंप सुरू करण्यात आले आहेत. उद्यापासून सलगरे येथे पाणी पोहोचल्यानंतर पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होणार आहेत. पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होताच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी पाणी उपसा करण्यासाठी नदीत चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कवठेमहांकाळपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या टप्प्यातील १८ पंपांद्वारे प्रति सेकंद एक हजार क्युसेक्स पाण्याचा उपसा करावा लागणार असल्याचे म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा इतर फळबागा व पानमळे उभे केले आहेत. थकित पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडल्याने द्राक्ष व फळबागांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र सध्याच्या उन्हाळ्यात एका महिन्याचे आवर्तन अपुरे असल्याने एप्रिलअखेर आवर्तन सुरू ठेवण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.