शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

By admin | Updated: June 8, 2017 23:20 IST

ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : मध्यभागी तलाव आणि चोहोबाजूला चार गावे. तलावाच्या काठीच या गावांच्या गावविहीरी. तलावात पाणी असेल तर विहीरीत पाणी. आणि विहीर भरलेली असेल तरच त्या गावांची तहान भागते; पण गेल्या तीन वर्षांपासून तलावातच ठणठणाट असल्याने चारही गावांना कोरड पडली. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागले. त्यामुळे मुबलक पाण्यासाठी ग्रामस्थांनी कष्ट उपसले. आणि ग्रामस्थांचे कष्ट पाहून तलावालाही अक्षरश: पाझर फुटला.कऱ्हाड तालुक्यातील मेरवेवाडी तलावावर अवलंबून असणाऱ्या मेरवेवाडी, पाचुंद, वाघेरी, कामथी गावावर टंचाईची भीषण परिस्थिती ओढवली होती. या चार गावांना वेगवेगळ्या चार गाव विहीरीतून पाणी पुरवठा होतो. संबंधित विहीरी एकाच ठिकाणी म्हणजे मेरवेवाडीतील तलावाच्या काठावर आहेत.तीन डोंगरांच्या मध्यभागी असलेल्या या तलावात पाणी साचले की ते पाणी पाझराद्वारे संबंधित चारही गावांच्या विहीरीत जाते. तिथून पुढे ते पाणी गावात पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र, गत तीन वर्षांपासून मेरवेवाडी तलावात नाममात्र पाणीसाठा होत होता. त्या पाण्यावरच चार गावांतील ग्रामस्थांना गुजराण करावी लागायची. गतवर्षी तर उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच या तलावात ठणठणाट झाला. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कामथीला पर्यायी पाण्याची व्यवस्था झाली. मात्र, मेरवेवाडी, पाचुंद व वाघेरी या गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. मेरवेवाडी तलावाच्या खालील बाजूस मेरवेवाडीसह पाचुंद, वाघेरी व कामथी गावांच्या चार गावविहीरी आहेत. मात्र सलग तीन वर्षे अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या चारही गावांच्या विहिरी गतवर्षी कोरड्या पडल्या. दिवसभरात तासभर वीजपंप चालेल एवढेच पाणी फक्त मेरवेवाडीच्या एका गाव विहिरीत जात होते. अन्य तीन गावांच्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या. त्या विहिरींना मेरवेवाडी गाव विहिरीतून पाणी सोडण्यात येत होते. या परिस्थितीमुळे कोणत्याच गावाला पाणी पुरत नव्हते. वाघेरी गावाने गतवर्षी तलावाच्या परिसरात बोअर मारली. मात्र बोअरला पाणी लागले नाही. त्यातच मेरवेवाडी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली. मात्र, प्रशासनाने टँकर पुरविण्याऐवजी त्या टंचाई कामातून गावात बोअर मारली. दुर्दैवाने त्यालाही पाणी लागले नाही. पाचुंदची गाव विहीर पूर्ण आटल्याने मेरवेवाडीच्या विहिरीतील अपुऱ्या पाण्यावरच त्यांना अनेक महिने तहान भागवावी लागली. कामथीची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच होती. ही चारही गावे अनेक महिन्यांपासून दुष्काळात होरपळत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी अखेर लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ एकवटले. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायचे ठरले. त्यासाठी प्रशासनाला साकडे घालून लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सलग काही दिवस बंधाऱ्यातील गाळही काढण्यात आला. तसेच दुरूस्तीची कामेही करून घेण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात या तलावामध्ये चांगला पाणीसाठा झाला. परिणामी, तलावासह नजीकच्या चारही विहिरी भरून वाहू लागल्या. तलावातील गाळ काढल्याने यावर्षीच्या ऊन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. मुबलक नसले तरी पुरेसे पाणी यावर्षात ग्रामस्थांना मिळाले. एकीच्या बळातून काय होऊ शकते?, याचे जीवंत उदाहरण या कामातून पाहायला मिळाले आहे. पाचुंद गाव टंचाईत होरपळलेपाचुंद गाव गतर्षी दुष्काळात अक्षरश: होरपळून निघाले. मे महिन्यात गाव विहीर कोरडी ठणठणीत पडल्याने मेरवेवाडी जे काही पाणी देईल त्यावर पाचुंद ग्रामस्थांना तहान भागवावी लागत होती. जिथे पिण्याच्या पाण्याची मारामार तिथे जनावरांना पाणी कोठून आणणार, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला होता. मात्र, सध्या तलावात पाणीसाठा असल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. चारा नसल्याने जनावरे विकलीवळीव पावसावर या परिसरातील डोंगरात भरपूर चारा पिकतो. मात्र, गतवर्षी वळीव पावसाने हुलकावणी दिली. विभागात एकही समाधानकारक वळीव पाऊस झाला नाही. परिणामी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला. त्यामुळे चारा नसल्याने काही शेतकऱ्यांना आपली जनावरेही विकावी लागली होती. गतवर्षीपेक्षा यावर्षीची स्थिती चांगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तलावातील गाळ काढल्याने आणि दुरूस्तीची कामे झाल्याने तलावात अद्यापही पाणी शिल्लक आहे. टेंभूतील पाणी तलावात सोडामेरवेवाडी तलावात यावर्षी पुरेसा पाणीसाठा झाला असला तरी मुबलक पाणीसाठा होऊन मेरवेवाडीसह वाघेरी, पाचुंद व कामथी या चारही गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्याची गरज आहे. त्यासाठी या तलावात टेंभू प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी चारही गावांतील ग्रामस्थांची व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावाही सध्या सुरू आहे.