शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपांवर ‘पाणी’

By admin | Updated: October 26, 2014 23:00 IST

शेतकरी चिंताग्रस्त : पीक काढणी ठप्प; परतीचा मान्सून कोसळला

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शनिवारी दुपारी दीडपर्यंत परतीचा मान्सून कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पीक काढणी ठप्प झाली. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे. यंदा जुलै महिन्यात दमदार पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक महिना उशिरा सर्वच पिकांची पेरणी झाली. परिणामी खरिपांची पिकेही एक महिना उशिरा म्हणजे आता परिपक्व झाली. सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांच्या काढणीचा हंगाम वेगात सुरू आहे. पीक काढणी- पाठोपाठ मळणीही केली जात आहे. सोयाबीन व ज्वारीची मळणी यंत्रावर केली जात आहे. भात पिकाची मळणी डांबरी रस्त्यावर किंवा शेतातच ते बडवून काढले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आकाशात ढग दाटून आल्याने पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले. रात्री आठनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारी दीडपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कापणी करून मळणीसाठी ठेवलेले पीक पावसाने भिजले. पिकांचे ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून पावसापासून संरक्षण करण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत; मात्र पाऊस जोराचा असल्यामुळे रचून ठेवलेले पीक भिजले. परिपक्व झालेले मात्र कापणी न झालेले भात पीक शेतातच जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे. जमिनीत ओल झाल्याने वापसा आल्यानंतर काढणीच्या कामाला पुन्हा प्रारंभ करावी लागणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यामुळे बळिराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हरबरा, गहू, शाळू यांची पेरणी केली जात आहे. पेरणीला पाऊस अतिशय पोषक ठरला. याशिवाय गेल्या आठवड्यात पेरणी होऊन उगवून आलेल्या रब्बी पिकांच्या वाढीसाठीही पाऊस उपयुक्त आहे. दुसऱ्या बाजूला रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीचे काम ठप्प झाली. आॅक्टोबर हिट सुरू झाल्यामुळे ऊस पीक वाळत होते. यामुळे शेतकरी विहिरीतील उसाला पाणी देत होता. आता पावसामुळे एक पाण्याचा फेर देणे वाचणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पावसामुळे खूश आहे. (प्रतिनिधी)