शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ निवडणूक स्थगितीच्या प्रयत्नांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण गुरुवारी न्यायालयाच्या पटलावरही ही ...

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण गुरुवारी न्यायालयाच्या पटलावरही ही याचिका येऊ शकली नाही. आता ती आणखी सात दिवसांनी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थगितीसाठीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. आता ही याचिका पटलावर येईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रियाही पूर्ण होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील इतर सहकारी संस्थांप्रमाणेच गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती द्यावी, अशी याचिका गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केली होती; पण तेथेही प्रारूप याद्या जाहीर झाल्या असल्याने निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित करता येत नसल्याचे सांगत कार्यक्रम घोषित करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

गुरुवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना, तिकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सत्ताधाऱ्यांचे डोळे लागले होते; पण संध्याकाळ झाली तरी याचिका पटलावर आली नाही. शिवाय आता ती पुढील सात दिवसतरी पटलावर येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आता ठरल्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रमाला सामोरे जाणे एवढाच मार्ग शिल्लक राहिला असून, न्यायालयातील याचिका व त्यांचा निकाल ही केवळ औपचारिकता राहिली असल्याचे स्पष्ट झाले.