शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 01:09 IST

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता ...

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविली.मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. दुसºया टप्प्यातील मोहिमेतून नाल्यातील सुमारे १४ डंपर कचरा काढून तो उठाव केला. बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ असा नारा देत जनजागृती रॅली काढली. ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते सिद्धार्थनगर या दरम्यान कोल्हापूर शहरातून जाणारा हा जयंती नाला स्वच्छ करून पाणी प्रवाहित केले.महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केल्याप्रमाणे शहरातून वाहणारा जयंती नाला लोकसहभागातून सफाईच्या मोहिमेला गेल्या रविवारी (दि. ५) प्रारंभ केला. त्यानंतर रविवारी दुसºया टप्प्यात नाला सफाईला प्रारंभ झाला. उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, न्यायाधीश उपेशचंद्र मोरे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, फेरीवाला संघटनेचे दिलीप पोवार यांनी सक्रिय सहभाग नोदवला.पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंत, साईक्स एक्स्टेन्शनमधील जयप्रकाश नारायण उद्यान, यल्लमा मंदिरनजीक असे तीन ग्रुप करून ही स्वच्छता मोहीम राबविली. शहर पाणीपुरवठा व ड्रेनेज, बोअरिंग, बाग विभाग, आरोग्य विभाग, एन.यु.एल.एम., महिला बचत गट, स्थानिक नागरिक सहभागी झाले. सर्वांनी जयंती तसेच इतर नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, नागरिकांनी कचरा कोंडाळ्यातच किंवा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या घरातील कचºयाचे ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करून महापालिकेच्या कर्मचाºयांकडे द्यावा, असे महापालिकेच्या वतीने आवाहन यावेळी करण्यात आले.बचत गटांच्या रॅलीने उपक्रमाची सांगताउपक्रमाची सांगता आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’अशा घोषणा देत रॅलीद्वारे केली. यावेळी महिलांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. या बचत गटांमध्ये वारणानगर येथील वारणा प्रेरणा सी.एम.आर.के. गट, माळीम महिला विकास बचत गट, आसावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, शाहूपुरी येथील स्वरा फौंडेशन यांचा सहभाग होता.स्वयंसेवी संस्थांचा सहभागया नाला सफाई मोहिमेला लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यामध्ये फेरीवाला संघटना, क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशन, हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचारमंच यांच्यासह अनेक महिला बचत गटांचा सहभाग होता. महापालिकेच्या आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशमन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉपमधील सुमारे १००० अधिकारी, कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सहभाग नोंदविला.