शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

‘धोम-बलकवडी’चे पाणी पोहोचले गिरवीत !

By admin | Updated: April 20, 2015 00:23 IST

अखेर स्वप्नपूर्ती : रखरखीत माळ भिजल्याने फलटण तालुक्याच्या पूर्व भागात जल्लोष

वाठार निंबाळकर : फलटण तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागाला ‘धोम-बलकवडी’चे पाणी मिळावे हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे स्वप्न आणि ‘चिमणरावांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे शब्द रविवारी सत्यात उतरले. कोरड्या रखरखीत माळावर कालव्यातून पाणी खेळले आणि गिरवीकरांनी जल्लोष केला.गिरवी (ता. फलटण) हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव. त्यांनी या कायम दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून त्याकाळी वारंवार जिकिरीचे प्रयत्न केले. १९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हाच दुष्काळी भागाच्या पाण्याचा मुद्दा घेऊन विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ असा शब्द निवडणूक प्रचारात रामराजे वारंवार देत असत.१९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या स्थापनेसाठी आमदारांची गरज होती. ती पूर्ण करण्याच्या बदल्यात धोम-बलकवडी व नीरा-देवघर धरणे पूर्ण करण्याची अट रामराजेंनी ठेवली. हे पाणी आदर्कीपर्यंत आले. या ठिकाणी माजी आमदार चिमणराव कदम, शंकरराव जगताप व माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करून रामराजेंनी वेगळेपण दाखविले. बिबी आणि वाघोशी येथे जलपूजन झाल्यानंतर पुढे बाणगंगा नदीत पाणी सोडून पुन्हा जलपूजन झाले. अशा रीतीने तालुक्यात पाच वेळा जलपूजन झाले. मात्र, गिरवी येथे पाणी येण्यास विलंब लागला.रविवारी पाणी गिरवी गावच्या परिसरात पोहोचले आणि गिरवीकरांची प्रतीक्षा संपली. सध्या धोम-बलकवडी कालव्याच्या एकूण १४७ किलोमीटर अंतरापैकी फलटण तालुक्याच्या हद्दीतील १२२ किलोमीटरपर्यंतची कामे पूर्ण झाली असून, गिरवीकरांची पाण्याची गरज विचारात घेऊन उपलब्ध पाणी गिरवी नळपाणी पुरवठा योजनेच्या तलावात सोडण्यात आले आहे.गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी विलंब लागण्याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या अडचणी येत होत्या; मात्र संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी या अडचणी सोडविण्यास मदत केली.तुळजाभवानीला अभिषेकगिरवीच्या शिवारात आलेले पाणी घेऊन गिरवीकर पहाटेच तुळजापूरला गेले. या पाण्याने त्यांनी भवानीमातेला अभिषेक केला. तथापि, गिरवीत पाणी आल्याचे पाहण्यास चिमणराव कदम हवे होते, अशी हळहळ व्यक्त करताना ग्रामस्थांचे डोळे ओलावले होते.