शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:45 IST

पन्हाळा : पाणीउपसा करणाऱ्या विद्युत पंपात बिघाड झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून पन्हाळगडाला कमी दाबाने व दोन दिवसआडाने पाणीपुरवठा होत असल्याने पन्हाळगडावर पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.पन्हाळगडाला १९८० साली आसुर्ले येथून जीवन प्राधिकरणाच्या वतीने नळपाणी पुरवठा योजनेला सुरुवात करण्यात ...

पन्हाळा : पाणीउपसा करणाऱ्या विद्युत पंपात बिघाड झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून पन्हाळगडाला कमी दाबाने व दोन दिवसआडाने पाणीपुरवठा होत असल्याने पन्हाळगडावर पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.पन्हाळगडाला १९८० साली आसुर्ले येथून जीवन प्राधिकरणाच्या वतीने नळपाणी पुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ते आजपर्यंत या योजनेकडे जीवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या संपूर्ण पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे यामध्ये वारंवार बिघाड होऊन पन्हाळगडाचा पाणीपुरवठा खंडित होत आहे.आसुर्ले येथून पाणी दरेवाडी, पाटाचीवाडी, रेडेघाट असे टप्प्या-टप्प्याने आणून पन्हाळ्याला पाणी सोडण्यात येते. मात्र, पाटाचीवाडी येथील पाणीउपसा करणाºया विद्युत पंपात बिघाड झाल्याने पन्हाळ्यातील रेडेघाट येथे पाणीसाठाच कमी होत असल्याने पन्हाळगडाला सध्या पाणी येण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, कधी दोन दिवसआडाने, कधी तीन दिवसआडाने, तर कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री कमी दाबाने अल्पप्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. त्यातच या पाणी संकट काळात नगरपरिषदेकडून टँकरने अथवा इतर पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पन्हाळ्यासाठी उत्रे येथील साडेपाच कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी, तसेच जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेने या जुन्या योजनेत झालेला बिघाड दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.