शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा थकविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडणार

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

पाण्याची कनेक्शन तोडण्यात यावीत

कोल्हापूर : महानगरपालिकेचा घरफाळा थकविणाऱ्या शहरातील मिळकतधारकांची पाण्याची कनेक्शन तोडण्यात यावीत, थकबाकीदारांच्या मालमत्तापत्रकावर बोजा चढवावा, असा आदेश स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आज महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले. जे मिळकतधारक प्रामाणिकपणे तसेच निर्धारित वेळेत घरफाळा भरतील त्यांना अनुक्रमे चार व दोन टक्के सवलत देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. मनपा घरफाळा विभागाच्या उत्पन्नवाढ तसेच वसुलीबाबत आढावा घेण्याकरिता सभापती चव्हाण यांनी आज अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, कर निर्धारक व संग्राहक दिलीप कोळी, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते. पुढील आठवड्यात शंभर थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी केली. घरफाळा वसुलीच्या उद्दिष्टाप्रमाणे जे कर्मचारी काम करतील त्यांना बक्षीस देण्यात येईल आणि जे कर्मचारी कामचुकार करतील, कामामध्ये हयगय करतील, दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात टाळाटाळ करतील अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश सभापती चव्हाण यांनी प्रशासनाला दिले. घरफाळा थकबाकीमध्ये मनपाचे कर्मचारी अगर त्यांचे कुटुंबीय असतील तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून थकबाकी वसूल करा, घरफाळा लागू नसलेल्या नवीन इमारती शोधून काढून त्यांच्यावर आकारणी करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. गटनेता शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांनी महापालिकेला नगरोत्थान योजनेसाठी उभे करण्यात येणाऱ्या कर्जासाठी प्रत्येक खात्याची वसुली वाढवावी, अशा सूचना दिल्या. वसुली करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याचे उद्दिष्ट ठरवून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. नगरसेवकांना प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी देण्यात यावी, जर एखाद्या कुटुंबात भाऊबंदकीचा वाद असेल बिले भरली जात नाहीत अशा थकबाकीदारांना त्यांच्या कुटुंबाप्रमाणे स्वतंत्र बिले देण्याची सूचना यावेळी आदिल फरास यांनी मांडली. सभापती चव्हाण यांनी सर्वाधिक वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी अकरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. (प्रतिनिधी)