शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरुटेंवर फौजदारीचा ठराव

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

शिक्षक संघ महामंडळ सभा : लेटरपॅडचा गैरवापर केल्याचा आरोप; दुफळी निर्माण केल्याची टीका

कोल्हापूर : शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांचा शिक्षक संघाशी दुरान्वयेही संबंध नसताना त्यांनी संघाचे बेकायदेशीर लेटरपॅड वापरून गैरवापर सुरू केला आहे. याबद्दल त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय महामंडळात करण्यात आला.यावेळी वरुटे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत हिंमत असेल तर त्यांनी ३३ जिल्ह्यांत जाऊन महामंडळ सभा घेऊन दाखवावी, असे उघड आव्हानही शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी यावेळी दिले. भाजपचे महासमन्वयक वसंत वाणी प्रमुख उपस्थित होते. शिक्षक संघाची महामंडळ सभा आज, रविवारी कोल्हापुरात झाली. स्वागतामध्येच संघाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांनी वरुटे यांच्या कारनाम्याचा पंचनामा करण्यासाठीच कोल्हापुरात महामंडळ सभा आयोजित केल्याचे स्पष्ट केले. संघाचा फायदा घेऊन राज्याचे नेतृत्व केले, त्याच संघात दुफळी निर्माण करण्याचे पाप वरुटे करत असून, या प्रवृत्तीच्या जिल्ह्यातच मुसक्या आवळल्या जातील, असे सांगत संघाच्या नावाचा गैरवापर करत असल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव एस. व्ही. पाटील यांनी मांडला. राज्याध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या वरुटेंना गडचिरोलीतील रस्ते माहिती आहेत का? ज्यांनी मोठे केले, त्यांनाच पायाखाली घेण्यास निघालेल्या वरुटेंची कोल्हापुरातच कोल्हेकोई सुरू आहे, अशी टीका शिक्षक नेते एन. वाय. पाटील यांनी केली. स्वार्थासाठी संघटना फोडणाऱ्यांनी आम्हाला तोरा शिकवू नये. दोन वर्षांपूर्वी वरुटे कोठे होते, याचे आत्मचिंतन करावे, असे आवाहन करत आजपर्यंत कोणत्याही पदासाठी संघटनेचे काम केले नाही. शिक्षक व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच प्रयत्न केल्याने राज्यातील शिक्षकांचा आपणावर विश्वास असल्याचे संघाचे मार्गदर्शक प्रा. एस. डी. पाटील यांनी सांगितले. शिक्षक बॅँक लुटणाऱ्यांना कोल्हापूरकर येथे गाडतील, असे संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले. वरुटे व वसंत हारुगडे यांचे नाव घेण्याइतकेही ते लायकीचे नाहीत. एकही जिल्हाध्यक्ष बरोबर नसताना रोज उठून शिक्षक संघाची बदनामी करणाऱ्या वरुटेंनी हिंमत असेल तर ३३ जिल्ह्यात जाऊन महामंडळ सभा घ्यावी, असे उघड आव्हान संभाजीराव थोरात यांनी केले. रोडक्या मल्लांशी कुस्ती कसली?कोल्हापूरकरांनी राजाराम वरुटे यांना नाका-तोंडात माती जाईपर्यंत चारी मुंड्या चीत केले आहे. वरुटे हा कोल्हापूर जिल्ह्यापुरता विषय असल्याने महामंडळ सभेत त्यांच्यावर चर्चा करून रोडक्या मल्लांशी कसल्या कुस्ती खेळता, असे सांगत शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करा, अशी सूचना पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी केली. खालच्या पातळीवर जाऊन टीकावरुटेंनी आजपर्यंत स्वार्थी राजकारण केलेच; त्याचबरोबर लग्न करतानाही पैशासाठी एका वेडसर मुलीशी लग्न केले, अशी खालच्या पातळीवर जाऊन शिक्षक बॅँकेचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांनी टीका केली; पण याबद्दल सभेतच उलटसुलट चर्चा होती.