शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वारणा दूध संघाची निवडणूक सलग ७ व्यांदा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

संचालक मंडळात ७ नव्या चेहऱ्यांना संधी लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : देशात आणि देशाबाहेरील दुग्ध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या ...

संचालक मंडळात ७ नव्या चेहऱ्यांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर : देशात आणि देशाबाहेरील दुग्ध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने वारणा दूध संघाची २०२१ ते २०२६ यासाठीची निवडणूक ७ व्यांदा बिनविरोध झाली. सोमवारी संघाच्या कार्यस्थळावर दुपारी विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

वारणा दूध संघाच्या २१ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. संचालक मंडळात ७ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

यावेळी वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह नूतन सर्व संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, गतवेळच्या निवडणुकीत संघ आर्थिक अडचणीत असताना मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालो. या पाच वर्षांच्या काळात अनेक आवाहनांना सामोरे जावे लागले. संघाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासद, ग्राहक, कर्मचारी यासह सर्वांनी साथ दिली. दोन वर्षांत ७२ कोटींच्या नव्या विस्तार योजना राबविल्याने त्याचा फायदा संघाला झाला. येत्या दोन वर्षामध्ये

वारणा दूध संघ कर्जमुक्त होणार आहे. वारणा दूध संघ, कॅडबरी प्रकल्पात नव्याने विस्तार तसेच कार्यक्षेत्रासह साडेसात लाख लिटर दुधाचे संकलन करण्याचे उद्दिष्ट, नवी विक्री व्यवस्था यावर संघाने भर दिला आहे, असे कोरे यांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी अरुण चौगले यांनी, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नामदेव दवडते, ॲड. शिवाजी यादव, अशोक पाटील, सचिन माने आदींनी काम पाहिले.

बिनविरोध निवडून आलेले संचालक असे - अ वर्ग उत्पादक सभासद गट - (१३ जागा ) -

विनय विलासराव कोरे (वारणानगर), चंद्रशेखर जनार्दन बुवा (बुवाचे वाठार), प्रदीप राजाराम देशमुख (नवे पारगाव),हिंदुराव रंगराव जाधव (बहिरेवाडी), शिवाजी रामचंद्र कापरे (कोडोली), राजवर्धन हंबीरराव मोहिते (घुणकी), अभिजित शिवाजीराव पाटील (चिकुर्डे ), धैर्यशील ऊर्फ मयूर रमेश पाटील (कोरेगाव), दीपकराव आनंदराव पाटील (खोची), कृष्णा रामचंद्र पाटील ( केखले), अ. ड. नेमगोंडा रायगोंडा पाटील (किणी), विजयकुमार तातोबा पाटील (कुरळप), महेंद्र बजरंग शिंदे (वाठार तर्फे वडगाव)

ब वर्ग संस्था सभासद गट (२ जागा) - अरुण बाबासाहेब पाटील (कुंभोज), लालासाहेब आनंदराव पाटील (तांदूळवाडी).

महिला प्रतिनिधी - (२ जागा) -

शोभा प्रकाश पाटील (कांदे), शमशाद मीरासाहेब मुल्ला (कोडोली),

अनुसूचित जाती /जमाती (२ जागा) - डॉ. मिलिंद विठ्ठल हिरवे (माले), शिवाजी महादेव जंगम (जाखले)

क वर्ग सभासद गट (२ जागा) -

माधव प्रभाकर गुळवणी (तळसंदे),

शिवाजी आकाराम मोरे (मोहरे),

फोटो -

२१ संचालकाचे फोटो Koldesk@ वर मेल केले आहेत...