शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना यावर्षी पंढरपूरसाठी जादा रेल्वे सोडण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने मिरजेतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी तीनच रेल्वेगाड्या आहेत. आषाढी कार्तिकी वारीसाह दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी सहा वाजता रात्री साडेआठ वाजता अशा तीनच रेल्वेगाड्या आहेत. सोमवार व शुक्रवारी दुपारी कोल्हापूर गोंदिया एक्स्प्रेस आहे. दररोज सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत बारा तासात पंढरपूरला जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. आषाढी-कार्तिक वारीला कर्नाटक व कोकणातून येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. मात्र यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने वारकऱ्यांची अडचण झाली आहे. सायंकाळी व रात्री सुटणाऱ्या पॅसेंजरला वारकऱ्यांची खचाखच गर्दी आहे. रेल्वेत पाय ठेवायला जागा नसल्याने वृध्द, महिला व बालकांचे हाल सुरू आहेत. जादा रेल्वेपासून मोठे उत्पन्न मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याच्या कारणावरून पंढरपूरसाठी जादा रेल्वे न सोडण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)