शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी

By admin | Updated: June 29, 2016 00:59 IST

जिल्हाधिकारी : नगरपालिका निवडणुका

कोल्हापूर : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत जिल्ह्णातील ९ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (१ जुलै)ला दुपारी ३ वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.जिल्ह्णातील ९ नगरपरिषदांच्या विभागाच्या प्रभागाचे आरक्षण सोडतीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी देण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. आरक्षण सोडत काढण्यासंदर्भातील कामकाजाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्णातील पात्र नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या आरक्षण सोडतीचे कामकाज काटेकोरपणे व्हावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, प्रभाग आरक्षण सोडतीचे काम आयोगाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शक सूचनांनुसार करावे, यामध्ये कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीचे कामकाज पारदर्शी व काटेकोरपणे व्हावे, असेही ते म्हणाले.जिल्ह्णातील नगरपरिषदांच्या प्रभाग आरक्षण सोडत संबंधित नगरपालिका क्षेत्रात निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. नगरपालिकेचे नाव, आरक्षण सोडतीचे ठिकाण याची माहिती पुढीलप्रमाणे - इचलकरंजी-नगरपालिका सभागृह, मलकापूर-नगरपालिका सभागृह, पन्हाळा-नगरपालिका सभागृह, जयसिंगपूर-सिद्धेश्वर यात्री निवास हॉल, गल्ली नंबर ४, मुरगूड-यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद, कागल-शाहू नगर वाचनालय, कुरुंदवाड-जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान, गडहिंग्लज-नगरपालिका सभागृह आणि वडगाव-महालक्ष्मी मंगलधाम, नगरपरिषदेजवळ येथे होणार आहे. सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.