कोल्हापूर : शहरातील देवकर पाणंद परिसरात असलेल्या करण हेरिटेज अपार्टमेंट येथे महानगरपालिका प्रशासनामार्फत अपार्टमेंट मधील सभासदांची वॉक टेस्ट घेण्यात आली. विशेष म्हणजे, पालिकेचे उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे यांनी नागरिकांना घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
या वॉकटेस्टमध्ये ५० नागरिकांनी सहभाग घेतला. सर्व नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. सर्वांची ऑक्सिजन पातळी ९६ च्या वर आली. या वेळी करण हेरिटेजमधील रहिवासी असलेले महापालिका उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे यांनी उपस्थित सभासदांना कोविड अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.वॉकटेस्टचे नियोजनासाठी करण हेरिटेज सोसायटी अध्यक्ष विनय कोचरी व शरद शिंदे यांनी सहकार्य केले.
फोटो क्रमांक -३००५२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजीवनी अभियान अंतर्गत स्वत: उपायुक्त निखिल मोरे यांनी नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासली. या वेळी सहायक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे उपस्थित होते.