शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

साखर कामगारांना वेतन कराराची प्रतीक्षा

By admin | Updated: June 14, 2016 00:19 IST

शरद पवारांच्या कोर्टात निर्णय : साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका; दुष्काळ पार्श्वभूमीमुळे केवळ १0 टक्के वेतनवाढ

प्रकाश पाटील --कोपार्डे --गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला साखर कामगारांच्या वेतन कराराच्या प्रश्नांचा तिढा यासाठी नेमलेल्या त्रिपक्षीय समितीला सुटता सुटेना झाला आहे. गुरुवारी (दि. ९) झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अखेर वेतन कराराचा प्रश्न लोंबकळत राहिला असून, याबाबत माजी कृषिमंत्री आणि साखर उद्योगाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, असा कारखानदार, कामगार संघटना, शासकीय प्रतिनिधींच्या बैठकीत उभयपक्षी निर्णय झाल्याने साखर कामगारांच्या वेतन कराराचा निर्णय अखेर शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. दर पाच वर्षांनी साखर कामगारांच्या होणाऱ्या वेतन कराराची मुदत एप्रिल २0१४ मध्ये संपली. यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने वेळेवर नवीन करारासाठी प्रयत्न न केल्याने कारखानदार व शासनानेही याकडे दुर्लक्ष केले. अखेर साखर आयुक्तालयावर राज्यभरातील साखर कामगारांनी धडक मोर्चा काढल्यानंतर काँग्रेस आघाडी शासनाने तब्बल दीड वर्षाने शिवाजी गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामगार, कारखानदार व शासन यांचे दहा-दहा प्रतिनिधी घेऊन वेतन कराराची त्रिपक्षीय समिती नेमली; पण या समितीकडूनही केवळ बैठका घेण्याच्या पुढची कोणतीच पावले उचलली गेली नसल्याने अखेर २ जानेवारी २0१६ ला राज्य साखर कामगार संघटनेकडून संपाची हाक दिली. यावेळी शासनाला जाग आली. ९00 रुपये अंतरिम वाढ देत अंतिम वेतनवाढीचा निर्णय दोन महिन्यांत घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, या कालावधीत बैठक आयोजित करण्याची तसदी राज्य साखर कामगार संघटनेने घेतली नाही. तोपर्यंत राज्यातील साखर कारखान्याचे गाळप हंगाम बंद झाल्याने आता कारखानदार साखर कामगारांच्या हक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतानाचे चित्र पाहायला मिळत आहेत.गुरुवारी (दि. ९ जून) झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत कारखानदारांच्या प्रतिनिधींनी आडमुठी भूमिका घेत, सध्या दुष्काळी परिस्थिती असून १0 टक्केच वेतनवाढ घ्या, असे ठामपणे सांगताच साखर कामगारांच्या प्रतिनिधींनी याला तीव्र विरोध केला.मागील २00९ च्या वेतन करारावेळी १८ टक्के वेतनवाढ दिली होती. त्यानंतर महागाई वाढल्याने किमान २५ ते ३0 टक्के तरी वेतनवाढ मिळावी, अशी ठाम भूमिका घेतली. बैठकीत कारखानदारांनी दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उचलून ही बैठक मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, साखर कामगारांनी यावर साखर उद्योगाचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री शरद पवार जो काही निर्णय देतील, तो आम्हाला मान्य होईल, असे सांगितले. यावर कारखानदारांनीही सहमती दर्शविली. यामुळे आता साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे.आठ-नऊ बैठका होऊनही कारखानदारांची आडमुठी भूमिका असल्याने वेतन कराराला मूर्त स्वरूप येत नाही. आम्ही आशावादी आहोत. समन्वयाची भूमिका घेऊन हा प्रश्न सुटावा असे वाटते.- राऊसो पाटील कार्याध्यक्ष राज्य साखर कामगार प्रतिनिधीगुरुवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत साखर उद्योगातील सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, असा निर्णय घेण्यात आला.७ जुलैला वेतन करारासाठी नेमलेल्या त्रिपक्षीय समितीचा कार्यकाल होणार समाप्तसरकारचे वेतन कराराकडे दुर्लक्षकाँग्रेस आघाडी शासनाने ही समिती स्थापन केली होती. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश अधिक होता. जर साखर कामगारांचा प्रश्न मिटला तर याचे श्रेय काँग्रेस व राष्ट्रवादीलाच मिळणार, यामुळेच विद्यमान भाजप शासन या वेतन काराराकडे दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया साखर कामगारांतून व्यक्त होत आहेत.सहकार मंत्र्यांनी लक्ष घालावे ज्या कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी आजही मोठ्या दिमाखात उभी आहे, त्याच जिल्ह्यातील चंद्रकातदादा पाटील हे विद्यमान भाजप सरकारात सहकारमंत्री आहेत. या सहकारी साखर कारखानदारीला आपल्या कष्टाने व बुद्धीने टिकविणाऱ्या साखर कामगारांच्या वेतन कराराबद्दल त्यांनी लक्ष घालावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.