शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहाला केशवरावांच्या पुतळ्याची प्रतीक्षा

By admin | Updated: August 6, 2015 23:55 IST

प्रस्ताव प्रलंबित : माजी महापौरांचे आश्वासन हवेतच, आराखड्यात समावेशच नव्हता

इंदुमती गणेश -कोल्हापूर -संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने पुन्हा नव्या दिमाखात साकारलेल्या नाट्यगृहाला केशवरावांच्या पुतळ््याची प्रतीक्षा आहे. नाट्यगृहाच्या आराखड्यात पुतळ््याचा समावेशच नसल्याने नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचा पडदा केशवरावांच्या पुतळ््यानेच उघडेल, हे माजी महापौरांचे आश्वासन हवेतच विरले आहे. केशवरावांचे १२५ वे जयंती वर्ष पुतळ््याविना साजरे करावे लागणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणापूर्वी झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या संचालकांनी माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यापुढे नाट्यगृहाच्या आवारात संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा असावा, अशी मागणी केली होती. त्यावर माजी महापौरांनी नूतनीकरण झाल्यानंतर या नाट्यगृहाचा पडदा उघडेल तेव्हा आवारात केशवरावांचा पुतळा असेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे. नाट्यगृहाच्या जवळपास २५ कोटींच्या आराखड्यात पुतळ््याचा कुठेही समावेश नसल्याने पहिल्या टप्प्यात पुतळा बसविण्याचे कष्ट महापालिका प्रशासनाने घेतलेले नाही. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेनेही नंतर त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या नाट्यगृहाच्या आवारात केशवरावांचा पुतळा असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट अशी की पुतळ््यासाठी प्रवेशद्वाराजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. आराखड्याचा दुसरा टप्पा १४ कोटींचा असून तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावेळी पुतळा बसविण्यात येईल, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.नाट्यगृह, खासबाग मैदानाचे काम अंतिम टप्प्यातनाट्यगृहाचे आणि खासबाग कुस्ती मैदानाचे नूतनीकरण आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या नाट्यगृहात खुर्च्या बसविण्याचे काम सुरू आहे. शिवाय वीज कनेक्शन, साऊंड सिस्टीमची चाचणी, परिसराची स्वच्छता, परवाने अशा तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याने नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन केशवराव भोसलेंच्या जयंतीला होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतीकात्मकरीत्या नाट्यगृहाच्या आवारात केशवराव भोसले यांची जयंती साजरी करणार आहे. नाट्यगृहाच्या मूळ आराखड्यात केशवराव भोसले यांच्या पुतळ््याचा समावेश नसल्याने पहिल्या टप्प्यात तो बसविता आलेला नाही. मात्र, पुतळ््यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरणाच्यावेळी पुतळा बसविण्यात येईल. - अनुराधा वांडरे, प्रकल्प अधिकारी