शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’ फायर स्टेशनला उद्घाटनाची प्रतीक्षा!

By admin | Updated: December 10, 2014 23:58 IST

गाडीसाठी प्रस्ताव : कर्मचारी निवासासह सुसज्ज फायर स्टेशन

राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लज शहर व परिसराला अग्निशमन सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी नगरपालिकेने सुसज्ज फायर स्टेशन बांधले आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह अग्निशमन गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे. सुमारे ५६ लाख रुपये खर्चून बांधलेले हे फायर स्टेशन अजून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. १९७९ पासून नगरपालिकेतर्फे अग्निशमन सेवा सुरू झाली. स्वतंत्र फायर स्टेशन नसल्यामुळे नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला तात्पुरत्या शेडमध्येच अग्निशमन गाडी व कर्मचारी तैनात असतात. गडहिंग्लज शहर व परिसरासह नजीकच्या आजरा, चंदगड, भुदरगड व कागल तालुक्यांतदेखील संकटकालीन सेवा पुरविली जाते. प्रशिक्षित व पुरेसे कर्मचारी नसतानाही गडहिंग्लजसह सीमाभागातील आगीच्या घटना आणि आपत्तकालीन परिस्थितीत या विभागाने मोलाची कामगिरी बजावली आहे.गडहिंग्लज तालुक्याचे सुपुत्र आणि वडाळा फायर स्टेनशनचे सेवानिवृत्त प्रमुख राष्ट्रपतिपदक विजेते शामराव शिंदे यांच्या सहकार्याने फायर स्टेशनसाठी भरीव निधी मिळाला आहे. आता नवीन अग्निशमन गाडी व अत्याधुनिक उपकरणे मिळाल्यानंतर हे फायर स्टेशन खऱ्या अर्थाने सुसज्ज होईल.फायर स्टेशनमधील किरकोळ कामे संपल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात येईल. नवीन गाडी व रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अत्याधुनिक उपकरणांसह फायर स्टेशन लवकरच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाईल. - कावेरी चौगुले, उपनगराध्यक्षा, गडहिंग्लज.आपल्या कारकिर्दीतच फायर स्टेशनसाठी ४० लाखांचा निधी मिळाला. अग्निमशन गाडी खरेदीचा ३० लाखांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास मंजुरी मिळविण्याबरोबरच लक्ष्मी यात्रेपूर्वी फायर स्टेशन जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे.- राजेंद्र मांडेकर, माजी नगराध्यक्ष, गडहिंग्लज२४ तास सेवा देण्यासाठी सुपरवायझर-१, लिडिंग फायरमन-३, असिस्टंट फायरमन-६, वाहनचालक-३ अशा १३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, या विभागाकडे चारच कायम कर्मचारी आहेत. नवीन नोकरभरतीवर बंद आहे. ६ कर्मचारी ठेका पद्धतीवर घेण्यात आले आहेत.अग्निशमन विभागासाठी ब्रिथिंग अ‍ॅपरेटस, होज पाईप, होज कपलिंग, फोम ब्रँचेस, पोेर्टेबल फायर पंप, हेड लॅम्प, जॅकस, रेस्क्यू ट्यूल्स या अत्याधुनिक उपकरणांची गरज आहे. नवीन फायर स्टेशनच्या विद्युतिकरणासह या उपकरणांसाठी पाच लाखांच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.खातेप्रमुखपदच रिक्त : अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन पर्यवेक्षक हे खातेप्रमुखपदच रिक्तआहे. आकृतिबंधाप्रमाणे सुपरवायझर १, लिडिंग फायरमन १, असिस्टंट फायरमन - ३, वाहनचालक-२ अशा एकूण ७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सातपैकी ३ जागा रिक्त आहेत.