शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लाईनबझारचे हॉकीपटू ‘आॅस्ट्रो टर्फ’च्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:55 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : सरावासाठी आॅस्ट्रो टर्फ मैदान आम्हालाही उपलब्ध झाल्यास आम्हीसुद्धा हॉकीमध्ये राज्य ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : सरावासाठी आॅस्ट्रो टर्फ मैदान आम्हालाही उपलब्ध झाल्यास आम्हीसुद्धा हॉकीमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवू शकतो, असा आत्मविश्वास लाईन बझारमधील हॉकी खेळाडू व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खेळाडू आॅस्ट्रो टर्फ मैदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या या खेळाडूंचा सराव मातीच्या मैदानावर सुरू आहे. तरीही हे खेळाडू या खेळात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत.नुकतेच केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आॅस्ट्रो टर्फ बनविण्यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे लाईन बझार हॉकी मैदानावरील आॅस्ट्रो टर्फ मैदानाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये लाईन बझारमधील खेळाडूंची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यामुळे येथील खेळाडूंनाही सरावासाठी लाईन बझार हॉकी मैदानावर आॅस्ट्रो टर्फ व्हावे, असे सातत्याने वाटत आले आहे. त्यासाठी त्यांनी विविध पातळीवर यापूर्वी प्रयत्न केले आहेत व सध्याही ते करीत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळापासून लाईन बझारात हॉकी खेळली जात आहे. आज घरोघरी एक हॉकीचा खेळाडू आहे. या खेळाच्या जोरावर अनेक तरुणांना पोलीस, रेल्वे, शिक्षण, बँका, सहकारी संस्था अशा अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व देश पातळीवर चमकले आहेत. पण केवळ आॅस्ट्रो टर्फ मैदानावरील सराव नसल्याने येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकले नाहीत. याची खंत येथील खेळाडू, प्रशिक्षक व हॉकी शौकिनांच्या मनात आजही घर करून आहे. मध्यंतरी या मैदानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार सतेज पाटील व महापालिका यांचेकडून निधी प्राप्त झाला होता.लाईन बझारला हॉकीची पंढरी म्हणून ओळखले जाते. लाईन बझारच्या प्रत्येक घराघरांत हा हॉकीचा खेळ रुजला आहे, फुलला आहे. हॉकीच्या मैदानावर फारशा सुविधा नसतानाही हा खेळ दिवसेंदिवस बहरतच चालला आहे. मातीचे मैदान असल्यामुळे नेहमी नाकातोंडात मातीचा धुरळा जातो. मैदानावरील खडकावरून नेहमी पडायला होते. काही वेळेला मैदानावरील खडकावर आपटून चेंडू उसळी घेऊन खेळाडू जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत येथील खेळाडूंचे हॉकीवरील प्रेम जराही कमी झालेले नाही. त्यांना आता प्रतीक्षा आहे ती हॉकीची पंढरी असलेल्या लाईन बझारमध्ये आॅस्ट्रो टर्फ मैदान व्हावे याचीच. आॅस्ट्रो टर्फ व मातीच्या मैदानावरील सरावात खूप फरक आहे. आॅस्ट्रो टर्फ मैदानाचा सराव नसल्याने मातीच्या मैदानावरील सराव करणारे खेळाडू स्पर्धेच्या वेळी लगेचच दमतात. त्यामुळे ते सामन्याच्या वेळी आपली पुरेपूर चमक दाखवू शकत नाहीत. सध्या पुणे व मुंबई येथे अशी मैदाने आहेत. आंतरराष्ट्रीय सामने आॅस्ट्रो टर्फ मैदानावर होतात. त्यामुळे तिथे पोहचायचे असेल तर इथल्या खेळाडूंना आॅस्ट्रो टर्र्फ मैदानावरील सरावाशिवाय पर्याय नाही. हे मात्र निश्चित!