शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल ग्राम’ पंचायतींना धनादेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 26, 2014 00:00 IST

गांधीनगर, उजळाईवाडी : पुरस्कार प्रदान होऊन झाली तब्बल दोन वर्षे

रमेश पाटील -कसबा बावडा -करवीर तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी या दोन ग्रामपंचायतींना दोन वर्षांनंतरही ‘निर्मलग्राम’ बक्षिसाच्या रकमेचा धनादेश मिळालेला नाही. औरंगाबाद येथे शासनाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या दोन ग्रामपंचायतींना केवळ प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले होते. रोख रकमेचा धनादेश नंतर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. बक्षिसाची रक्कम मिळावी म्हणून या दोन ग्रामपंचायतींनी करवीर पंचायत व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही.प्रत्येक गाव, तालुका निर्मलग्राम व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही अनुदान व बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून पुढे निरोगी, समृद्ध आणि सुखी जीवनासाठी मंत्र म्हणून प्रत्येक घरात शौचालये झाली. परिसर, शाळा, घराची अंगणे स्वच्छ होऊ लागली. पात्र ठरलेल्या गावांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशस्तिपत्र, शिल्ड व रोख रक्कम मिळाली. मात्र, याला तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी ही दोन गावे मात्र बक्षिसाच्या रकमेपासून वंचित राहिली आहेत.बक्षिसाची रक्कम किती आहे, यापेक्षा ती मिळाली किंवा आपली ग्रामपंचायत बक्षिसास पात्र ठरली, याचाच अभिमान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना जास्त असतो. गांधीनगर आणि उजळाईवाडी या ग्रामपंचायतीची बक्षिसाची रक्कम प्रत्येकी चार लाखांच्या पुढे आहे. मात्र, त्यांना ती मिळालेली नाही याचे त्यांना वाईट वाटते. जिल्हा परिषदेकडे याबाबत पत्रव्यवहार व चौकशी केल्यानंतर निधी नाही. निधी उपलब्ध झाल्यावर बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे उत्तर दिले जात असल्याचे या दोन ग्रामपंचायतीच्या सदस्यांतून बोलले जात आहे.गांधीनगर ग्रामपंचायत, निर्मलग्राम झाल्यावर सर्वांना आनंद झाला. औरंगाबाद येथील कार्यक्रमाला अनेक सदस्य व ग्रामस्थ गेले. तेथे केवळ सत्कार करून प्रशस्तिपत्र व शिल्ड देण्यात आले. बक्षिसाची रक्कम नंतर धनादेशाद्वारे दिली जाईल, असे स्पष्ट केले; परंतु अद्याप अशी रक्कम गांधीनगर ग्रामपंचायतीला मिळालेली नाही. बक्षिसाची रक्कम फार मोठी आहे असे नाही; परंतु ती अद्याप न मिळाल्याने काम करण्यातला उत्साह कमी होतो.- प्रतापराव चंदवाणी,गांधीनगर, ग्रामपंचायत सदस्य