शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये कॅटल शेडला निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:03 IST

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर झाल्याच्या याद्याही संबंधित ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. मात्र, या योजनेची कार्यवाहीच न केल्याने संबंधित लाभार्थी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर झाल्याच्या याद्याही संबंधित ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. मात्र, या योजनेची कार्यवाहीच न केल्याने संबंधित लाभार्थी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.योजनेची प्रक्रिया राबविण्यातच उन्हाळ्याचे चार महिने गेले. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात जनावरांना बांधायचे कोठे हा प्रश्न पडला आहे.‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या उक्तीचा अनुभव शेतकºयांना येत असून, कॅटलशेडची अवस्था माकडाच्या घराच्या गोष्टीप्रमाणे झाली आहे.आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब शेतकºयांना जनावरांचा गोठा दर्जेदार बांधता येत नाही. परिणामी गोठ्यातील अव्यवस्थेमुळे दुभत्या जनावरांसह इतर जनावरांना विविध आजार उद्भवू शकतात. याबाबत शासन पातळीवर विचारविनिमय होऊन पात्र शेतकºयांना गोठ्यांमध्ये कोबा टाकणे, गोदण बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित करण्यात आले.त्याप्रमाणे तालुक्यातील गावागावांतून पात्र पशुपालक शेतकºयांचे प्रस्ताव मागविण्यात आले. आलेल्या प्रस्तावांतून ५०० शेतकºयांना या योजनेत सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे ही मंजूर यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडेही पाठविण्यात आली आहे. मात्र, अद्याप याबाबतकोणतीही कार्यवाही न झाल्याने संबंधित लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.अटींच्या पूर्ततेनंतरही दुर्लक्षचहे काम रोजगार हमी योजनेतून केले जाणार आहे. यासाठी आवश्यक तीन-चार कामगारांचे जॉब कार्ड, बँक खाती, रिकामी जागा, आदी सर्वच अटींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाही अद्याप वर्क आॅर्डर मिळालेली नाही.मिळणाºया अनुदानातून निधी जनावरांच्या पायात कोबा (मजबूत स्लॅब) तसेच, गोदण बांधण्याच्या अटीवर दिला जाणार आहे. त्यामुळे हा निधी मिळणार कधी आणि जनावरांना आसरा मिळणार कधी याबाबत उद्विग्नता व्यक्त होत आहे.अधिकारी कागदपत्रांच्या तिढ्यातच...एप्रिल महिन्यापासून रोहियोतील कामगारांना मजुरीवाढ करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे पूर्वीचे दरपत्रक बदलून नव्याने दरपत्रक तयार करणे, त्याचे नियोजन करणे यामध्येच अनेक दिवस प्रशासन गुरफटले आहे.तसेच, पात्र लाभार्थ्यांची यादी रोहियो विभागाकडून बांधकाम विभागाकडे पाठविली जाते, तर बांधकामचे अधिकारी त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा या विभागाकडे पाठवून त्याला वर्कआॅर्डर दिली जाते.मात्र, या संत प्रक्रियेमुळे आम्हाला नाहक त्रास होत असल्याचे लाभार्थ्यांतून बोलले जात आहे.