शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘अण्णा भाऊ साठे अध्यासन’ प्रतीक्षेत

By admin | Updated: July 18, 2014 00:56 IST

विद्यापीठाची तयारी, शासनाची उदासीनता : शासनाकडे प्रस्ताव तीन वर्षांपासून पडून

संतोष मिठारी = कोल्हापूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन, शिवाजी विद्यापीठाकडून सादर झालेला प्रस्ताव, सामाजिक संघटनांकडून पाठपुराव्यांतील सातत्य असूनदेखील विद्यापीठातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासनाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. विद्यापीठाची तयारी असूनदेखील निव्वळ शासनाची उदासीनता अध्यासनाला मारक ठरत आहे. उद्या, शुक्रवारी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात हे चित्र स्पष्ट झाले आहे.थोर साहित्यिक, समाजचिंतक व कामगार चळवळीचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची प्रस्तुतता आजही अधोरेखित करता येते. या महापुरुषाच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र होण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी निवेदन, मोर्चा, आंदोलनाद्वारे विद्यापीठाकडे मागणी केली.त्यानुसार अण्णा भाऊ यांच्या कार्याविषयीची तीव्र सामाजिक भावना विचारात घेऊन विद्यापीठाने त्यांचे अध्यासन व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे २७ जुलै २०११ रोजी सादर केला. त्यानंतर विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अध्यासन केंद्राला मान्यता देण्याचे आश्वासन दिले. त्यावर लगेचच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठासह याबाबत लढा देणाऱ्या, पाठपुरावा करणाऱ्या संघटनांना होती. मात्र, त्यावर काहीच झाले नाही. त्यानंतर विद्यापीठाने २ जानेवारी २०१२ रोजी पुन्हा या प्रस्तावासह स्मरणपत्र पाठविले. सामाजिक संघटनांनी मंत्र्यांना निवेदने दिली, तरीही अध्यासनाबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. विद्यापीठाने मान्यतेचा प्रस्ताव सादर करून तीन वर्षे उलटली, तरी शासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे. लालफितीतील शासनाचा हा कारभार थोर साहित्यिक, समाजचिंतक अण्णा भाऊ यांची आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी लढा देणाऱ्यांची परवड करणारा आहे.