शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे

By admin | Updated: April 29, 2017 00:43 IST

वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे

तीन अधिकारी; ४९ कर्मचारी कामाच्या तणावात : गुन्हेगारी क्रमवारीत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावरआयुब मुल्ला ल्ल खोचीपेठवडगाव पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कित्येक वर्षांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे परिसरातील २२ गावांत होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करताना जिकिरीचे होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील इतर काही ठाण्यांची नेमणुकीची आकडेवारी पाहता वडगाव मात्र अपेक्षित संख्याबळापासून उपेक्षितच राहिले आहे. सध्या प्रशासकीय बदल्यांचा हंगाम सुरू आहे. त्याचा विचार करता किमान अजून जादा पाच पोलिस अधिकारी व वीस कर्मचारी देणे गरजेचे आहे. त्यामुळे जलदगतीने गुन्हे तपासणी होईल.वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावीस गावे आहेत. नऊ किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग आहे. इचलकरंजी, सांगली, तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा मार्ग आहे. गेल्या चार वर्षांपासून हा परिसर संवेदनशील बनला आहे. वार्षिक गुन्हे सुमारे २०० प्रलंबित आहेत. अश सर्व परिस्थिती व पार्श्वभूमीचा विचार करता सध्याच्या संख्याबळाला प्रचंड कामाचा ताण आहे, ही वस्तुस्थिती आहे.सध्या एक पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यासह ४९ पोलिस कर्मचारी आहेत.विद्यमान पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह यापूर्वीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी चिन्मय पंडित (आयपीएस) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी केलेली आहे.१ या ठाण्याला ४५ पोलिस कर्मचारी कित्येक वर्षापासून मंजूर आहेत. त्यानंतर लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी याचा वाढलेला आलेख लक्षातच घेतला गेलेला नाही, असेच म्हणावे लागेल. साडेतीन दशके जुनीच मंजुरी पाहिली जाते. त्यामध्ये बदल गरजेचा आहे.२ यासाठी गेल्या तीन वर्षांत सतत मागणी करण्यात आली; पण अद्यापही यश आलेले नाही. तरीसुद्धा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नियोजनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करीत गुन्हेगारीवर वचक बसविणे यासह पेंडींग गुन्ह्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य दिले आहे. ३ अपुऱ्या संख्याबळामुळे अनेक अडचणींची संख्या वाढतच आहे. यासाठी संख्याबळ वाढवून देणे गरजेचे आहे. सध्या तीन अधिकारी व ४९ पोलिस कर्मचारी आहेत. यामध्ये अजून पाच अधिकारी व वीस पोलिस कर्मचारी वाढवून मिळणे गरजेचे आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरच वाढत चाललेला ताण कमी होईल.