शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वडणगे, शिये, सांगरूळ, पाचगाव राखीव ?

By admin | Updated: October 4, 2016 01:03 IST

आरक्षणामुळे दिग्गज धास्तावले : कोपार्डे, उचगाव, परिते, सडोली खालसा खुला होण्याची शक्यता--करवीरचेराजकारण

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण सोडतीकडे करवीरकरांच्या नजरा लागल्या असून, गत दोन निवडणुकीतील आरक्षण पाहता वडणगे, शिये, सांगरूळ, पाचगाव यापैकी दोन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होणार आहेत. कोपार्डे, उचगाव हे मतदारसंघ खुले होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका फेबु्रवारी २०१७ मध्ये होत असून, करवीर तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती मतदारसंघातील आरक्षण सोडत उद्या, बुधवारी आहे. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिये जिल्हा परिषद मतदारसंघ सन २००७ ला सर्वसाधारण महिला तर २०१२ ला सर्वसाधारण राहिला आहे. वडणगे २००७ व २०१२ सलग दोनवेळा खुला राहिला आहे. सांगरूळ सन १९९२ पासून सन २००७ पर्यंत खुला राहिला आहे, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित राहिला. पाचगाव सन २००७ खुला, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित राहिला. या चारपैकी दोन मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे. कोपार्डे सन २००७ अनुसूचित जाती, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय राखीव राहिला आहे. उचगाव सलग दोनवेळा इतर मागासवर्गीयसाठी आरक्षित आहे. सडोली खालसा व परिते सन २००७ ला इतर मागासवर्गीय, तर सन २०१२ अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिले. त्यामुळे हे चारही मतदारसंघ खुले होण्याची शक्यता अधिक आहे. मुडशिंगी, कळंबे तर्फ ठाणे (नवीन दिंडनेर्ली), गोकुळ शिरगाव या मतदारसंघाला लॉटरी लागू शकते. यापैकी एखादा खुलाही होऊन इतर मतदारसंघ राखीवही राहू शकतात.इच्छुकांना झटका : पुनर्रचनेचीही धास्ती!यावेळेला मतदारसंघाच्या पुनर्रचनेसह आरक्षण काढले जाणार आहे. पुनर्रचनेत गावे इकडे तिकडे होणार आहेत. कळंबे, पाचगांव, कोपार्डे, सांगरूळ मतदारसंघांतील गावे इकडे-तिकडे सरकल्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होणार नाही, पण पंचायत समितीच्या इच्छुकांना झटका बसणार हे नक्की आहे.