शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी २३ जूनला मतदान शक्य

By admin | Updated: May 6, 2015 00:24 IST

अंतिम मतदार यादी प्रसिध्द : २१ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची मंगळवारी २१८५९ मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली असून मतदान २३ जून ला होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयाने प्रक्रियेची तयारी सुरू केली असून २१ में पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होऊ शकते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधानगरीच्या प्रातांधिकारी मोनिका सिंह काम पाहणार आहेत. बाजार समितीची निवडणूक विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार, पणन प्रक्रिया अशा पाच गटात १९ जागांसाठी होत आहे. २००७ ला समितीच्या झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस-जनसुराज्य आघाडीने १९ पैकी १७ जागा जिंकत बाजी मारली होती. संचालक मंडळाला विविध कारणाने मुदतवाढ मिळत गेली आणि त्याचदरम्यान समितीवर प्रशासक आले. गेले दोन वर्षे समितीवर प्रशासक आहेत. आता निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी अंतिम यादी प्रसिध्द केली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेने गती घेतली आहे. बाजार समिती पोटनियमानुसार अंतिम यादीनंतर पंधरा दिवसाने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी पंधरा दिवसांचा तर माघारीसाठी अवघे दोन दिवस असतात. माघारीनंतर पंधरा दिवसाने मतदान घेतले जाते. त्यामुळे साधारणता २१ में पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होऊ शकते. अशी आहे जागांची विभागणीविकास संस्था गट एकूण जागा - ११सर्वसाधारण- ७महिला- २भटक्या विमुक्त - १ग्रामपंचातय गट एकूण जागा - ४इतर मागासवर्गीय- १सर्वसाधारण- २अनूसूचित जाती- १आर्थिक दुर्बल- १अडते व व्यापारी गट - २हमाल-तोलाईदार - १पणन प्रक्रिया - १गटनिहाय मतदान असे- तालुकाविकास संस्थाग्रामपंचायत ( एकूण मतदार)(एकूण मतदार) करवीर२४७ (३१०८)११७(१२२४)पन्हाळा२४८(३०२८)१११(९४५)शाहूवाडी८८(१०६२)१०६(८२६)राधानगरी१९७(२३२४)९८(८३३)गगनबावडा६७(८०४)२९(२०९)भुदरगड२०२(२३८४)९७(७५६)कागल९४ (११८३)४४(४३५)एकूण११४३ (१३८९६)६०२(५२२८)असा असू शकतो संभाव्य कार्यक्रम :२१ मे ते ४ जून - उमेदवारी अर्ज दाखल ६ जून - अर्जांची छाननी९ जून - माघारीची अंतिम मुदत२३ जून- मतदान